उत्तर प्रदेशातील मुझफ्फर नगर जिल्ह्यातील बुढाणा येथे राहणारे नवाजुद्दीन सिद्दीकी (नवाजुद्दीन सिद्दीकी) प्रत्येकाला माहिती आहेत. नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी स्वत: मेहनत घेत बॉलिवूडपर्यंतचा टप्पा गाठला. प्रत्येक भूमिका त्यांनी वेगळ्या पद्धतीनं पार पाडली. एवढंच नाही तर त्यांचे डायलॉग प्रत्येकाच्या मनाला भिडणारे आहेत.
मांझी- द माउंटेन मैन या चित्रपटातील ‘भगवान के भरोसे मत बैठिए.... क्या पता भगवान हमारे भरोसे बैठा हो...’ हा डायलॉग मोठ्या प्रमाणात गाजला.
फ्रीकी अली चित्रपटातील ‘खेल कोई भी हो... हम गरीब लोग या तो जीतते हैं... या सीखते हैं... हारते कभी नहीं...’
किक चित्रपटातील त्यांची भूमिका प्रत्येकाला आवडली होती. यामधील ‘पैदा तो मैं भी शरीफ हुआ था, पर शराफत से अपनी कभी नहीं बनी...’ हा डायलॉग आजही प्रत्येकाच्या मनाला भिडतो.
बजरंगी भाईजान या चित्रपटातही नवाजुद्दीन यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली. या चित्रपटातील त्यांचे डायलॉग प्रेक्षकांना प्रचंड आवडले. ‘कराची से लोग ईद मनाने अपनों में अंदरुने मुल्क जा रहे हैं... कैमरामैन कामिल युसुफ के साथ चांदनवाब कराची...’ छोटी भूमिका असली तर त्यांनी ही भूमिका चांगलीच गाजवली होती.
गैंग्स ऑफ वासेपुरमधील ‘धंधे में दो चीजों पर कभी भरोसा नहीं करना चाहिए... एक तो खुद से पैदा होने वाले खौफ पे... और दूसरा किसी के साथ पे...’
‘कभी कभी लगता है अपुनिच भगवान है...’ या डायलॉगनं सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घातलेला पाहायला मिळाला होता. नेटफ्लिक्सवरील ‘सेक्रेड गेम्स’ या सीरिजमधील हा डायलॉग होता.
तर द लंचबॉक्स या चित्रपटातील ‘मेरी अम्मी कहती है कि कभी कभी गलत ट्रेन भी सही जगह पहुंचा देती है!!’ हा डायलॉग प्रत्येकाच्या आयुष्याशी निगडीत आहे.
किक चित्रपटातील ‘जिसे जिंदगी की परवाह होती है मां कसम, मरने को मजा उसी को आता है...’ या डायलॉगमध्ये प्रत्येकाला आपलं आयुष्य दिसतं.
शाहरुख खानच्या रईस या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. या चित्रपटात नवाजुद्दीन यांचा डायलॉग आहे… ‘रईस का और मेरा रिश्ता बहुत अजीब है... पास रह नहीं सकता और साला दूर जाने नहीं देता...’
फ्रीकी अली या चित्ररपटानं अनेकांची मनं जिंदली आहेत. त्यातच ‘जीत में तो हर आदमी साथ देता है... साथी तो वो है जो हार में भी साथ दे...’ हा डायलॉग प्रेक्षकांना चांगलाच आवडला होता.