मुंबई : ‘आशिक बनाया आपने’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण करणारी हॉट अभिनेत्री तनुश्री दत्ताला आजच्या घडीला कोण ओळखत नाही? लोक अजूनही तिच्या अंदांवर फिदा आहेत. तनुश्री आज (19 मार्च) तिचा 37वा वाढदिवस साजरा करत आहे. अलीकडेच तिने पुन्हा एकदा फिट बनून चाहत्यांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे. पण, या आश्चर्यकारक परिवर्तनाआधी ही अभिनेत्री खूप कठीण काळाला सामोरी गेली होती. ती इतकी नैराश्यात गेली होती की, त्यावर मात करण्यासाठी तिने सन्यासिनीचे जीवनही स्वीकारले होते. तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज आपण तनुश्रीच्या जीवनाशी संबंधित अशा काहीच कठीण क्षणांबद्दल जाणून घेणार आहोत (Birthday Special Story when Bollywood Actress Tanushree Dutta turns spiritual personality).
तनुश्री दत्ता ही बॉलिवूडमधील एक बोल्ड अभिनेत्री मानली जाते. या बंगाली अभिनेत्रीच्या सौंदर्याचे लोक अजूनही दिवाने आहेत. 2003 साली तनुश्रीने ‘मिस इंडिया’चे विजेतेपद जिंकले होते. तेव्हापासून ती कायम मॉडेलिंग क्षेत्रामध्ये सक्रिय होती. ‘आशिक बनाया आपने’ या चित्रपटाद्वारे तिला बॉलिवूडमध्ये ओळख मिळाली. यात त्याने अभिनेता इमरान हाश्मीसोबत स्क्रीन शेअर केली होती. पण, त्यानंतर तिचे बरेच चित्रपट फ्लॉप झाले. यामुळे ती नैराश्यात गेली. तिने अचानक चित्रपटसृष्टीतून गायब होऊन अध्यात्माचा मार्ग धरला होता. यासाठी ती लडाखला देखील गेली होती.
तनुश्रीने यापूर्वी एका मुलाखतीत सांगितले होते की, जेव्हा ती कठीण काळातून जात होती, तेव्हा तिला सद्गुरुंचे पुस्तक वाचायला मिळाले. ते ती वाचत होती. त्यामध्ये लिहिलेल्या गोष्टींमुळे तिला इतकी प्रेरणा मिळाली की, तिने अवघ्या अडीच तासात ते संपूर्ण पुस्तक वाचले. तेव्हापासून तिच्या मनात अध्यात्म जाणून घेण्याची अधिक इच्छा निर्माण झाली होती. 2010मध्ये तिच्या एका मित्राने तिला कोयंबटूरमध्ये असलेल्या आश्रमबद्दल सांगितले. तनुश्री तिथे गेली आणि तिने सगळ्या गोष्टी जवळून समजून घेतल्या. ती म्हणते की, तिथे गेल्यावर तिचे आयुष्य संपूर्ण बदलले आहे (Birthday Special Story when Bollywood Actress Tanushree Dutta turns spiritual personality).
एका मुलाखतीत तनुश्रीने सांगितले की, ‘आश्रमात राहून ती विपश्यनेबद्द्ल शिकली. यासंदर्भात ती लडाखलाही गेली. तिथे तिला बऱ्याच महिला संन्यासी भेटल्या. त्यानंतर तिने आपले केस मुंडण करण्याचे ठरवले. हे इतके सोपे नव्हते. कारण, जेव्हा तिच्या आईने तिला अशा अवस्थेत पाहिले, तेव्हा ती खूप दुःखी झाली. इतकेच नाही तर, जेव्हा तिने प्रथमच स्वत:ला आरश्यात पाहिले, तेव्हा तिलाही स्वत:ला पाहून घाबरायला झाले होते, असेही तनुश्रीने सांगितले.
आश्रमात राहत असताना तनुश्रीने स्वत:ला समजले आणि ओळखले. येथून तिच्या आयुष्यात बरेच बदल घडून आले. तिचा दृष्टीकोन खूप सकारात्मक झाला. तिने पुन्हा सामान्य जीवनात परत जाण्याचा निर्णय घेतला. तथापि, त्यानंतर तिने शरीर बदलण्याऐवजी विचार बदलण्यावर लक्ष केंद्रित केले. हळूहळू स्वत:वर ताबा मिळवल्यामुळे ती स्वतःत चांगले बदल घडवून आणू शकली. आता पुन्हा एकदा ती मनोरंजन विश्वात पदार्पणास सज्ज झाली आहे.
(Birthday Special Story when Bollywood Actress Tanushree Dutta turns spiritual personality)
Thalaivi Trailer Launch | मुहूर्त ठरला! कंगना रनौतच्या वाढदिवशी ‘थलायवी’चा ट्रेलर लाँच होणार!
Ram Setu | ‘राम लला’समोर ‘राम सेतु’चा मुहूर्त संपन्न, अक्षय कुमारने शेअर केला खास फोटो!