मुंबई : बॉलिवूडची क्वीन कंगना रणौत ही नेहमीच चर्चेत असते. ती प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिनं तिच्या अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. कंगना रणौतनं अभिनयासोबतच तिच्या सौंदर्यानंही चाहत्यांना भुरळ घातली आहे. कंगना नेहमी कोणत्याही विषयावर तिचं रोखठोक मत मांडताना दिसते. त्यामुळे ती अनेकदा वादातही सापडली आहे. तर आता कंगनानं एका वेगळ्याच विषयावर भाष्य केलं ज्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यामध्ये तिनं ऋतिक रोशनचा देखील उल्लेख केला आहे.
कंगनाने तिच्या ‘रिव्हॉल्व्हर रानी’ या चित्रपटातील वीर दाससोबतच्या किसींग सीनवर प्रतिक्रिया दिली आहे. 2014 मध्ये ‘रिव्हॉल्व्हर रानी’ या चित्रपटाचा शूटिंग झालं. यावेळी शूटिंगदरम्यान कंगना रणौतचा तिचा कोस्टार वीर दास याच्यासोबत एक किसींग सीन होता. यावेळी कंगना वीर दासला किस करताना तिने वीरच्या ओठातून रक्तच येईपर्यंत किस केलं. या प्रकारावर कंगनानं स्वतः भाष्य केलं आहे.
कंगनाने या प्रकारावर प्रतिक्रिया देताना त्या किसींग सीनच्या एका अहवालाचा स्क्रीनशॉट तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. हा स्क्रीनशॉट शेअर करत कंगनानं लिहिलं आहे की, मी ऋतिक रोशननंतर बिचार्या वीर दासची इज्जत लुटली? हे सगळं कधी झालं?, सध्या कंगनानं शेअर केलेली ही स्टोरी चांगलीच चर्चेत आहे.
दरम्यान, कंगना रणौत आणि ॠतिक रोशनच्या अफेअरबाबत नेहमीच बोललं जातं. बॉलिवूडमध्ये त्यांच्या अफेअरवरून बर्याचदा चर्चा होताना दिसते. तसंच ऋतिक आणि कंगना अनेकदा एकमेकांवर टीका करतानाही दिसले आहेत. तर कंगनाच्या कामाबाबत बोलायचं झालं तर ती लवकरच ‘इमरजेंसी’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसणार आहेत. तिचा हा चित्रपट पाहण्यासाठी तिचे चाहते चांगलेच आतुर झाले आहेत.