मुंबई : बॉलिवूडचा सदाबहार अभिनेते फारुख शेख (Farooq Shaikh) यांचा आज वाढदिवस आहे. फारुख यांचा जन्म 25 मार्च 1948 रोजी झाला होता. आज फारुख यांचा 73वा वाढदिवस आहे. 1977पासून ते 1989पर्यंत या अभिनेत्याने पडद्यावर आपल्या अभिनयाची जादू दाखवली होती. फारुख यांनी आपल्या अनोख्या अभिनय शैलीमुळे चाहत्यांना नेहमी वेड लावले. मोठ्या पडद्यानंतर अभिनेत्याने छोट्या पडद्यावरही आपल्या अभिनयाची छाप सोडली. फारुखच्या वडिलांची इच्छा होती की त्यांनी वकील व्हावे, परंतु अभिनय क्षेत्रात येणे हे त्यांचे स्वतःचे स्वप्न होते. चला तर, जाणून घेऊया फारुख यांच्याबद्दल काही खास गोष्टी…(Bollywood Actor Farooq Shaikh Birth Anniversary special)
कॉलेजच्या काळापासून फारुख शेख थिएटरमध्ये दाखल झाले होते. थिएटरमधील त्यांच्या अनोख्या अभिनय शैलीमुळे त्यांना 1973मध्ये रिलीज झालेल्या ‘गर्म हवा’ चित्रपटात ब्रेक मिळाला. फारुख यांना या चित्रपटासाठी केवळ 750 रुपये इतकेच मानधन मिळाले होते. बराच काळ फारुख चांगल्या कामासाठी संघर्ष करत राहिले.
निर्माता-दिग्दर्शक यश चोप्राच्या 1979मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘नूरी’ या चित्रपटाने फारूख शेख यांचे भविष्य बदलले. या चित्रपटाने फारुखला एक नवी ओळख मिळवून दिली. यानंतर 1981मध्ये रिलीज झालेल्या ‘उमराव जान’ या चित्रपटाने त्यांची कारकीर्द बदलली. आजपर्यंत चित्रपटात फारुख यांनी साकारलेल्या भूमिकेला चाहते अजूनही विसरलेले नाहीत.
फारुख यांनी चित्रपटात तसेच व्यावसायिक चित्रपटातही एक वेगळी ओळख निर्माण केली. ‘शतरंज के खिलाडी’, ‘उमराव जान’, ‘कथा’, ‘बाजार’, ‘चश्म-ए-बद्दूर’, ‘क्लब 60’ आणि इतर बऱ्याचशा चित्रपटातून चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. फारुख शेख यांनी सत्यजित रे, ऋषिकेश मुखर्जी आणि केतन मेहता यांसारख्या दिग्दर्शकांसोबत काम केले (Bollywood Actor Farooq Shaikh Birth Anniversary special).
फारुख शेखसोबत दीप्ती नवलची ऑनस्क्रीन जोडी प्रेक्षकांना खूप आवडली. या जोडीचा जवळपास प्रत्येक चित्रपट पडद्यावर यशस्वी झाला. फारुख शेख यांनी दीप्ती नवलबरोबर ‘चश्म-ए-बद्दूर’, ‘कथा’, ‘साथ-साथ’, ‘किसी से ना कहना’, ‘रंग बिरंगी’ यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते.
वर्षानुवर्षे अभिनय केल्यावर, 2010मध्ये ‘लाहोर’ मधील अभिनयासाठी त्यांना ‘सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता’ म्हणून राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2014 मध्ये रिलीज झालेला ‘यंगिस्तान’ हा फारुख शेख यांचा अखेरचा चित्रपट होता. 28 डिसेंबर 2013 रोजी, फारुख शेख यांनी हृदयविकाराच्या झटक्यामुळे या जगाचा निरोप घेतला.
(Bollywood Actor Farooq Shaikh Birth Anniversary special)
अबब ! शनाया कपूरने एवढ्या महाग बिकिनीवर केले फोटोशूट, किंमत तब्बल….
Malaika Arora : मलायचा अरोराकडून शिका प्लँक्सची मजेशिर पद्धत, व्हिडीओ व्हायरल
Marathi Serial : ‘स्वराज-कृतिकाच्या लग्नाची धामधूम आणि बरंच काही’, ‘सांग तू आहेस का’ मालिकेत लगीनघाईhttps://t.co/ooIelp34iH#Sangtuaheska #MarathiSerial #wedding
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 24, 2021