मुंबई : चित्रपटसृष्टीत एक असा काळ होता, ज्यावेळी नायक होण्यासाठी गोरा रंग, चांगले स्वरूप, चांगले व्यक्तिमत्त्व या सर्व गोष्टींना प्राधान्य दिले जात होते. मात्र, ओम पुरी (Bollywood Actor Om Puri) यांनी नायकाच्या या गृहितकांना फाटा देत, आपल्या अभिनय शैलीने अवघी चित्रपटसृष्टी गाजवली. साधारण शरीरयष्टी, धीर-गंभीर आवाज आणि अभिनयाची आवड यामुळे केवळ भारतच नाहीतर, देशविदेशातही ओम पुरींचे नाव आदराने घेतले जाते. उदरनिर्वाहासाठी एका ढाब्यावर भांडी घासणाऱ्या 6 वर्षांच्या मुलाने पुढे संपूर्ण चित्रपटसृष्टी गाजवली. (Bollywood Actor Om Puri Birth Anniversary special)
आपल्या अभिनयाने बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत सर्वांची मने जिंकणार्या ओम पुरी (Bollywood Actor Om Puri) यांचा जन्म 18 ऑक्टोबर 1950 रोजी झाला होता. पंजाबमध्ये जन्मलेल्या ओम पुरी यांनी ‘घाशीराम कोतवाल’ या मराठी चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. वयाच्या अवघ्या 6व्या वर्षापासून काम करण्यास सुरूवात करणार्या ओम पुरी यांनी अभिनयावरील प्रेमामुळेच पुढे ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मध्ये प्रवेश घेतला. ‘अर्ध सत्य’ या चित्रपटाने त्यांना ओळख मिळवून दिली.
अगदी बालपणापासूनच त्यांच्या आयुष्यात संघर्षाला सुरुवात झाली होती. ‘वयाच्या 6व्या वर्षी एका ढाब्यावर भांडी घासण्याचे काम सुरू केले होते,’ असे त्यांनी स्वतः एका मुलाखती दरम्यान सांगितले होते. लहानपणापासूनच चित्रपटांची आवड असल्याने त्यांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, अभिनयाचे शात्रोक्त शिक्षण घेण्यासाठी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला.( Bollywood Actor Om Puri Birth Anniversary special)
अभिनेत्याचा संघर्ष इथेच संपला असे नाही. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतल्यानंतर इतरांपेक्षा आपले इंगजी वाईट असल्याचे त्यांचे मत बनले होते. यामुळे ते खूप निराश व्हायचे. मग, त्यांनी जिद्दीने इंग्रजी भाषेवर काम केले. यात त्यांना नसीरुद्दीन शहा यांची साथ लाभली. इंग्रजी बोलण्यात ते इतके सराईत झाले की, पुढे 20 इंग्रजी चित्रपटांत त्यांनी काम केले.
ओम पुरी यांनी एका मुलाखतीदरम्यान स्वतःच्या मृत्यूविषयी भाकीत केले होते. ते म्हणलेले की, ‘माझा मृत्यू अचानक होईल. मी झोपायला जाईन आणि माझा मृत्यू झालेला कुणालाही कळणार नाही. माध्यमांत माझ्या मृत्यूची बातमी येईल, तेव्हा सगळ्यांना कळेल’. त्यांचे हे भाकीत तंतोतंत खरे ठरले. 6 जानेवारी 2017 राहत्या घरात त्यांचा मृतदेह आढळून आला होता. हृदयविकारच्या तीव्र झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे म्हटले गेले होते.
(Bollywood Actor Om Puri Birth Anniversary special)
#CINTAA remembers #OMPURI on his #BirthAnniversary (18 October 1950)@Djariwalla @actormanojjoshi @amitbehl1 @SuneelSinha @deepakqazir @NupurAlankar @abhhaybhaargava @RajRomit @sanjaymbhatia @rajeshwarisachd @neelukohliactor @JhankalRavi @rakufired @GhanshyamSriv19 pic.twitter.com/YvgPQQIFe6
— CINTAA_Official (@CintaaOfficial) October 18, 2020