मुंबई : कोरोना व्हायरसच्या काळात जगभरातील सर्वच लोक चिंताग्रस्त होते. त्या काळात लोकांना अनेक समस्यांना सोमोरे जाण्याची वेळ आली होती. बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या, काही जणांवर तर उपाशी राहण्याची वेळ देखील आली होती. अशावेळी बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood ) लोकांच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरला होता. लॉकडाऊन संपल्यानंतर आजही तो प्रत्येकाची मदत करतो आहे. तर, अनेक लोक त्याच्याकडे अनेक प्रकारची मदत मागत आहेत (Bollywood Actor Sonu Sood announce 1 lakh job opportunities).
आता सोनू सूद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नुकतेच सोनू सूदने एक ट्विट केले आहे, त्यामध्ये सोनूने लिहिले आहे की, ‘नवे वर्ष, नव्या आकांक्षा आणि नवी उमेद. आता एक लाख लोकांच्या नोकरीची व्यवस्था केली आहे. 5 वर्षात सुमारे 10 कोटी लोकांचे जीवन बदलण्याचा विचार आहे. आजच गुडवर्कर अॅप डाऊनलोड करा आणि उद्याचे भविष्य सुरक्षित करा’, अशाप्रकारची पोस्ट सोनू सूदने शेअर केली आहे.
नया साल, नई उम्मीदें
नई नौकरी के अवसर….
और उन अवसरों को आपके करीब लाते, नए हम।
प्रवासी रोज़गार अब है गुडवर्कर।
आज ही गुडवर्कर एप्लिकेशन को डाउनलोड करें और बेहतर कल की उम्मीद करें
App Link: https://t.co/GMX1RW36s5#AbIndiaBanegaKaamyaab #GoodWorker #NaukriPaanaHuaAasaan pic.twitter.com/yV6XTZ5RtD— sonu sood (@SonuSood) March 14, 2021
सोनूने या खास ट्विटमध्ये सांगितले आहे की, त्याने एक लाख लोकांच्या नोकरीची व्यवस्था केली आहे. तसेच या ट्विटमध्ये त्यांनी असेही सांगितले आहे की, या कामाच्या माध्यमातून येत्या 5 वर्षात 10 कोटी लोकांचे जीवन बदलण्याचा विचार तो करत आहे (Bollywood Actor Sonu Sood announce 1 lakh job opportunities).
कोरोना लॉकडाऊन दरम्यान सोनू सूद यांनी प्रवासी कामगारांना घरी पोहोचण्यास मदत केली होती. अडकलेल्या लोकांना त्यांच्या घरी आणि खेड्यात नेण्यासाठी अभिनेत्याने वैयक्तिक पातळीवर कठोर परिश्रम घेतले होते. इतकेच नाही, तर सोनूने देश तसेच परदेशात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यातही मदत केली होती. ज्यानंतर आता त्याने नोकरी देण्याविषयी जाहीर केले आहे, हा त्याचा एक खूप मोठा उपक्रम आहे.
उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील आपत्तीमुळे बरेच लोक बेघर झाले आहेत. अशा परिस्थितीत बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने पुन्हा एकदा मदतीसाठी हात वर केला आहे. चमोली दुर्घटनेत ग्रस्त कुटुंबातील मुलांना दत्तक घेण्याचा निर्णय सूदने घेतला आहे. टिहरी जिल्ह्यातील डोगी पट्ट्यात राहणाऱ्या कुटूंबाला त्याने मदतीचा हात दिला आहे. त्यांनी या कुटुंबातील चार मुलींना दत्तक घेतले आहे. या मुलींचे वडील दुर्घटनेत मारले गेले. आलम सिंगच्या चार मुलांना त्यांच्या अभ्यासाचा खर्च भागवण्यासाठी दत्तक घेण्याचे आश्वासन सोनू सूद यांनी दिले आहे.
वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, सोनू सूद सध्या आपला आगामी चित्रपट ‘किसान’च्या निमित्ताने चर्चेत आहेत. सोनूचा हा चित्रपट ई निवास दिग्दर्शित असून, राज शांडिल्य निर्मित करणार आहेत. या चित्रपटाशिवाय सोनू सूद यशराजच्या ‘पृथ्वीराज’ चित्रपटातही दिसणार आहेत. या चित्रपटात अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लर मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.
(Bollywood Actor Sonu Sood announce 1 lakh job opportunities)