विश्वसुंदरी ऐश्वर्या रायने तिच्या अभिनयासह सौंदर्याने चाहत्यांना भुरळ घातली आहे. मनोरंजन क्षेत्रात ऐश्वर्याने केलेल्या चित्रपटापेक्षा तिच्या सौंदर्याचे चर्चा जास्त व्हायच्या. या अभिनेत्रीने तिच्या अभिनय क्षेत्रात अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत. ‘देवदास’, ‘हम दिल दे चुके सनम’ अशा अनेक चित्रपटातून ऐश्वर्या रायने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले. तिने तिच्या सौंदर्यासह सुंदर अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावलं.
ऐश्वर्या रायच्या सुपरहिट चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर सलमान खानसोबतचा तिचा ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटाचे नाव पहिले लक्षात येत. लव्ह ट्रायंगलवर बनलेल्या या चित्रपटाच्या कथेचा प्रत्येक प्रेमी चाहता होता. या चित्रपटातील गाणीही त्यावेळी खूप चर्चेत होती आणि आजही लोकं ती गाणी गातात. त्यात या चित्रपटातील सर्वात गाजलेलं गाणं निंबूडा-निंबुडा सुद्धा लोकांना भरपूर आवडतं. ऐश्वर्या रायने निळ्या रंगाचा जड लेहंगा परिधान करून निंबूडा-निंबुडावर डान्स केला होता. त्यावेळी अनेकांच्या नजरा तिच्याकडे बघणाऱ्यांवर स्थिरावल्या होत्या. आजही कुठे ही हे गाणं लागलं तरी लोकं ते गाणं गातात. पण तुम्हाला माहित आहे का की या गाण्याच्या शूटिंगदरम्यान ऐश्वर्या रायला दुखापत झाली होती. तरी सुद्धा तिने तशाच जखमी अवस्थेत ते गाणं पूर्ण शूट केले. शूटिंग दरम्यान नेमकं काय घडलं ते जाणून घेऊयात
निंबुडा-निंबुडा या गाण्याच्या शूटिंग दरम्यान ऐश्वर्या राय एका झुंबरला धडकली, ज्यामुळे तिच्या पायाला गंभीर दुखापत झाली. या चित्रपटातील निंबुडा-निंबुडा या गाण्याचे शूटिंग आणि वेळेची कमतरता होती. यावेळी ऐश्वर्याने सुजलेला आणि जखमी झालेला पाय घेऊन अजिबात वेळ वाया न घालवता संपूर्ण गाणे शूट केले. या गाण्यात ऐश्वर्याने उत्तम डान्स केल्याबद्दल खूप कौतुक झाले. हे गाणं त्यावेळी लोकप्रिय गाणं ठरलं होतं. चित्रपटातील उर्वरित गाणीही लोकांना आवडली होती.
‘हम दिल दे चुके सनम’ला सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन, सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन, सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी आणि सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाइन असे चार राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. याशिवाय २००९ मध्ये या चित्रपटाला ९ फिल्मफेअर पुरस्कारही मिळाले होते.
‘हम दिल दे चुके सनम’मध्ये अभिनेता सलमान खान पहिल्यांदाच त्याची आई हेलनसोबत स्क्रीन शेअर करताना दिसला होता. या चित्रपटात अजय देवगण उर्फ वनराजची भूमिका साकारली होती. तर ऐश्वर्या राय नंदिनी आणि समीरच्या भूमिकेत सलमान खान झळकला होता. हा चित्रपट एका लव्ह ट्रायअँगलवर आधारित ही कथा होती, ज्यात नंदिनी आणि समीर एकमेकांवर प्रेम करतात. पण नंदिनी तिच्या कुटुंबासाठी वनराजशी लग्न करते. वनराजला नंदिनी आणि समीरच्या प्रेमाबद्दल कळल्यावर तो दोघांना एकत्र करण्याचा प्रयत्न करतो. पण नंदिनी शेवटी समीरला नाकारते आणि वनराजला तिचा जोडीदार म्हणून निवडते.