PHOTO | पाकिस्तान ते अमेरिका ‘या’ आहेत अनुष्का शर्माच्या ‘लूक-अ-लाईक’, पाहा किती जुळतात यांचे चेहरे…
बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हीने शाहरुख खानच्या ‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटाद्वारे मनोरंजन विश्वात पदार्पण केले होते. अनुष्काने बॉलिवूडमध्ये आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.
1 / 9
बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हीने शाहरुख खानच्या ‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटाद्वारे मनोरंजन विश्वात पदार्पण केले होते. अनुष्काने बॉलिवूडमध्ये आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. तिने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याच्याशी लग्न केले. मात्र सध्या अनुष्का सोबतच तिच्या सारख्या दिसणाऱ्या आणखी काही महिला खूप चर्चेत आल्या आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अनुष्का शर्माच्या या 3 लुक-अ-लाईक नेहमीच चर्चेत असतात. त्यातील पहिले नाव पाकिस्तानी अभिनेत्री रमशा खान (Ramsha Khan) यांचे आहे. या यादीतील दुसरे नाव ऐमन सलीम (Aymen Saleem) आहे. तर तिसरे नाव आहे अमेरिकन गायिका ज्युलिया मायकल्सचे (Julia Michaels) आहे.
2 / 9
पाकिस्तानच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्री रमशा खानला अनुष्का शर्माचे पाकिस्तान व्हर्जन मानतात. या विषयावर रमशा अनेकदा आपली प्रतिक्रिया दिली आहे.
3 / 9
परंतु, अभिनेत्री याबद्दल बोलताना बर्याच वेळा असे म्हणाली आहे की, मी अनुष्का शर्माची चाहती नाही किंवा मी कधीही तिला भेटले नाही. आता या तुलनेमुळे खूप त्रस्त झाली आहे, ती म्हणते की "लोक असे का म्हणतात मला माहित नाही, आमच्या दोघींचे चाहते आमची तुलना करतात".
4 / 9
पाकिस्तानी अभिनेत्री ऐमन सलीम आणि अनुष्का शर्मा यांच्या सौंदर्याचीही नेहमीच तुलना केली जाते. एवढेच नव्हे तर लोक त्यांची देखील तुलना करतात.
5 / 9
काही लोक अनुष्काच्या बाजूने बोलतात तर, काही लोक म्हणतात की ऐमन चांगली आहे, असे म्हणतात.
6 / 9
ऐमन सलीम पाकिस्तानी ड्रामा सिरीज 'चुपके चुपके'मुळे चर्चेत आली होती. अलीकडेच हा शो भारतात देखील खूप लोकप्रिय झाला आहे.
7 / 9
प्रसिद्ध अमेरिकन गायक ज्युलिया मायकल्स हिचे नेहमीच अनुष्काची लूक-अ-लाईक असे वर्णन केले जाते, तर स्वत: अभिनेत्रीनेही तिच्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
8 / 9
"हाय अनुष्का शर्मा, कदाचित आपण जुळ्या आहोत", असे ट्वीट ज्युलिया मायकल्स यांनी केले आहे.
9 / 9
ज्युलियाचे हे ट्विट वाचल्यानंतर अनुष्काने देखील तिला प्रत्युत्तर देताना लिहिले की "ओएमजी हो! मी आयुष्यभर तुला आणि आपल्या 5 ‘लूक-अ-लाईक’ लोकांना शोधत राहिले.”