अनेक विवाहित पुरुषांच्या प्रेमात, सौरव गांगुलीशी अफेअर; अन् अचानक बॉलिवूडमधून ही अभिनेत्री गायब

| Updated on: Dec 26, 2024 | 9:20 PM

बॉलिवूडची अशी एक अभिनेत्री जी वारंवार अनेक विवाहित पुरुषांच्या प्रेमात पडायची, सौरव गांगुलीशी अफेअर पण आजही ही अभिनेत्री सिंगलच. कोण आहे ही अभिनेत्री जिची लव्हलाइफ ही प्रचंड चर्चेत राहिली आहे.

अनेक विवाहित पुरुषांच्या प्रेमात, सौरव गांगुलीशी अफेअर; अन् अचानक बॉलिवूडमधून ही अभिनेत्री गायब
Follow us on

बॉलिवूडमधील सेलिब्रिटींचे चित्रपट गाजत नाही तेवढे त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दलच्या चर्चा आणि किस्से व्हायरल होतात. त्यात अभिनेत्री असल्या तर हमखास त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल चर्चा होताना दिसतात. अशी एक अभिनेत्री जी तिच्या चित्रपटांमुळे कमी आणि तिच्या अफेअर्स आणि खाजगी आयुष्यामुळे खूपच प्रसिद्धी झोतात आली होती.

अभिनेत्रीचे आयुष्य फारच चर्चेत 

या अभिनेत्रीचे विवाहित पुरुषांसोबत अनेक अफेअर्स, तसेच क्रिकेटरसोबत रिलेशन अशा अनेक चर्चा आहेत. पण आज ही अभिनेत्री सिनेसृष्टीपासून दूर आहे.90 च्या दशकातील अभिनेत्री नगमा. नगमा ही अभिनेत्रीचे अभिनयासोबत तिच्या सौंदर्यामुळेही चर्चेत असायची. सौंदर्याची खाण आणि अभिनयाने लाख चाहत्यांचा मनावर राज्य करणारी ही अभिनेत्री होती.

नगमाने बॉलिवूडपासून दक्षिणेपर्यंत, पंजाबीपासून भोजपुरी भाषेपर्यंतच्या चित्रपटांमध्ये काम केलंय. मात्र आज ही अभिनेत्री रुपेरी पडद्यापासून दूर आहे. नगमाची लव्ह लाइफ सर्वात जास्त चर्चेत राहिले आहे

सौरव गांगुलीसोबत अफेयर

ती अनेक वेळा विवाहित पुरुषांच्या प्रेमात पडायची, तसेच तिचे सौरव गांगुलीसोबत अफेयर होतं, त्यामुळे त्याचा संसारही संकटात आला होता असं म्हटलं जायचं. भारतीय संघाचा दिग्गज क्रिकेटपटू सौरव गांगुलीसोबत नगमाचं नाव बरंच दिवस चर्चेत होतं. दोघेही खूप वेळ एकत्र घालवायचे.

असं म्हटलं जातं की सौरव गांगुलीच्या पत्नीला त्यांच्या नात्याची माहिती मिळाली, त्यामुळे त्यांचा संसार संकटात आला होता. मात्र, नंतर नगमा आणि सौरवचे ब्रेकअप झाले.

अनेक अविवाहित पुरुषांच्या प्रेमात पडल्याची चर्चा 

नगमा दक्षिण भारतीय अभिनेता शरथ कुमारच्या प्रेमात पडल्याचंही म्हटलं जायचं. नगमा जेव्हा शरथ कुमारला भेटली तेव्हा त्यांचं लग्न झालं होतं. त्यांचा नात्याची बातमी पत्नीला कळल्यावर तिने घटस्फोटसाठी अर्ज केला. अनेक वादावादीनंतर नगमाने या नात्याला अपूर्णविराम लावला.

असं म्हणतात की, शरथ कुमारने तिला धमक्या देण्यास सुरुवात केली, त्यानंतर अभिनेत्रीला साउथ इंडस्ट्री देखील सोडावी लागली. नगमाचे मन पुन्हा एकदा विवाहित अभिनेता रवी किशनवर जडलं. मात्र, अभिनेत्रीने रवी किशनसोबतच्या नात्यावर कधीच भाष्य केलं नाही.

वयाच्या 50 व्या वर्षीही नगमा अविवाहितच

नगमाला सलमान खानची या अभिनेत्री या नावाने ओळखलं जायचं. नगमाने 1990 मध्ये सलमान खानच्या ‘बागी: अ रिबेल लव्ह स्टोरी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट 1990 मध्ये सर्वाधिक कमाई करणारा 7वा चित्रपट ठरला.

अभिनेत्रीने तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड, पंजाबी, मराठी आणि भोजपुरी चित्रपटांमध्येही काम केले आहे. नगमाला 9 भाषा येतात आणि तिने 10 भाषांमध्ये चित्रपटामध्ये काम केलंय.

नगमा हे अभिनेत्रीचे खरे नाव नव्हे

पण नगमाचं खरं नाव नंदिता अरविंद मोरारजी आहे. तिचा जन्म मुंबईत झाला. नगमाची आई मुस्लिम आणि वडील हिंदू आहेत. अभिनेत्रीची आई शमा काझी यांनी अरविंद प्रताप सिंह मोरारजी यांच्याशी लग्न केलं. मात्र, नंतर दोघे वेगळे झालं आणि त्याच्या आईने दुसरं लग्न केलं. नगमाने नुकताच तिचा 50 वा वाढदिवस साजरा केला पण अजूनही ती अविवाहितच आहे. ती इतक्यांदा प्रेमात पडूनही तिचं लग्न मात्र होऊ शकलं नाही.