लग्नाशिवाय हवंय मूल; कधीच आई होऊ शकत नसल्याची खंत; प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

| Updated on: Dec 01, 2024 | 4:17 PM

एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीने ती कधीच आई होऊ शकत नसल्याची खंत व्यक्त करत तिला लग्नाशिवायच आता मूल हवं असल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे.

लग्नाशिवाय हवंय मूल; कधीच आई होऊ शकत नसल्याची खंत; प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
Follow us on

बॉलीवूड आणि हॉलिवूडमध्ये सरोगसीच्या माध्यमातून मुले जन्माला घालण्याची प्रथा आता अधिकाधिक वाढतच चालली आहे. अशातच आता बॉलिवूडमधील एका अभिनेत्रीने लग्नाशिवाय बाळ हवं असल्याची इच्छा व्यक्त केली आहे.

ही अभिनेत्री आहे शर्लिन चोप्रा. शर्लिन अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतेच. किंवा तिच्या कपड्यांमुळे, वक्तव्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली असल्याचं पाहायला मिळालं आहे. यामुळेच ती टीकेची शिकार होत असते. आताही ती अशाच एका वक्तव्यामुळे ती चर्चेत आली आहे. शर्लिनला लग्नाशिवाय बाळ हवं असल्याची इच्छा तिने व्यक्त केली आहे.

शर्लिनला आई होऊ शकत नसल्याची खंत

शर्लिनने तिच्या तब्येतीबाबत मोठा खुलासा करत ती कधीही आई होऊ शकणार नसल्याची धक्कादायक बातमी सांगितली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान शर्लिनने ही माहीती दिली. ही माहिती ऐकून नक्कीच तिच्या चाहत्यांनाही धक्का बसला. शर्लिनने सांगितले की तिला सिस्टेमिक ल्युपस एरिथेमॅटोसस (SLE) नावाचा आजार आहे. त्यामुळे 2021 मध्ये तिची किडनीही निकामी झाली आहे.

शर्लिनने सांगितले आहे की, “माझ्या डॉक्टरांनी मला सांगितले आहे की या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी मला आयुष्यभर औषधे घ्यावी लागतील. मी दिवसातून तीन वेळा घेतो. मी प्रेग्नेंसीबद्दल कधीही विचार करु नये, असा सल्लाही त्यांनी दिला. कारण ते मूल आणि आई दोघांसाठीही घातक ठरु शकते.” असे सांगत शर्लिनने ती कधीच आई होऊ शकत नसल्याची खंत व्यक्त केली आहे.

लग्नाशिवाय हवंय मूल 

पण शर्लिन चोप्राने आई होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यासाठी ती इतर पर्यायही शोधत आहे. तिला किमान तीन किंवा चार मुले होण्याची आशा आहे. तिने याबाबत सांगितले की, “मी थोडा विचार केला आहे. मला प्रत्येक बाळाच्या नावाची सुरुवात A ने करायची आहे. मला Aने सुरू होणारी नावं खूप आवडतात. यामागे एक कारण असून मी लवकरच सर्वांना सांगेन. जेव्हा मी मुलांबद्दल विचार करते तेव्हा मला आतून फार आनंद होतो. त्यांच्या येण्याआधीच जर मला एवढा आनंद वाटत असेल तर त्यांच्या येण्याने माझ्या आनंदाला सीमा राहणार नाही.

शर्लिनच्या या बोलण्यावरुन तिला आई होण्याची ओढ लागली असल्याचं समोर आलं आहे. मात्र तिला असणाऱ्या आजारामुळे ती कधीच आई होऊ शकत नाही याचंही तिला दुःख आहे. दरम्यान शर्लिनने सांगितलेल्या तिच्या आजारामुळे तिच्या चाहत्यांनाही नक्कीच वाईट वाटले असून तिला काळजी घेण्यास सांगितले आहे.