करोडोची मालकीण असणारी प्रसिद्ध अभिनेत्री कमावलेले सर्व पैसे दान करते; कोण आहे ती?

| Updated on: Dec 04, 2024 | 5:01 PM

करोडोची मालकीण असणारी प्रसिद्ध अभिनेत्री तिच्या रिअॅलिटी शोमधून कमावलेले सर्व पैसे दान करते. या अभिनेत्रीची लाईफस्टाईल थक्क करणारी आहे. एवढच नाही तर ती शाहरूख खान आणि गौरीखानची अत्यंत जवळची मैत्रिण आहे.

करोडोची मालकीण असणारी प्रसिद्ध अभिनेत्री कमावलेले सर्व पैसे दान करते; कोण आहे ती?
Follow us on

बॉलिवूडमध्ये असणारे असे कित्येक कलाकार आहेत जे आपल्या कमाईतील काही हिस्सा हा कुठेना कुठे दान करत असतात. काही जण त्याबद्दल उघडपणे बोलतात तर काहीजण याबद्दल बोलणं पसंत करत नाही. अशीच एक अभिनेत्री आहे जी करोडोंची मालकिन आहे. ती रिअॅलिटी शोमधून कमावलेला पैसा हा सर्व दान करते.

रिॲलिटी टीव्ही शोमुळे चर्चेत

फॅब्युलस लाइव्ह्स व्हर्सेस बॉलीवूड वाइव्हज’ या रिॲलिटी टीव्ही शोमुळे चर्चेत आलेलं नाव म्हणजे शालिनी पासी. शालिनीची अलिशान लाईफस्टाईल थक्क करणारी आहे. शालिनीचा जन्म 8 ऑगस्ट 1976 रोजी दिल्लीत झाला. तिथेच ती लहानाची मोठी झाली. नवी दिल्लीतील मॉर्डन शाळेतून प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. शालेय शिक्षणात ती खूप हुशार होती. तिने कला क्षेत्रात पुढील शिक्षण पूर्ण केलं.

शालिनी राज्यस्तरीयवर जिम्नॅस्ट आहे. ‘माय आर्ट शालिनी’ आणि ‘शालिनी आर्ट फाउंडेशन’ची मालकीण आहे.आर्किटेक्चरल डायजेस्टनुसार, शालिनीचे दिल्लीतील घर 20,000 स्क्वेअर फूटमध्ये बनले आहे. तिच्या घरात 4 रुम आहेत. तिचे घर अतिशय भव्य आहे, जे तिने तिच्या आर्ट कलेक्शनने सजवले आहे. दरम्यान शालिनीचे पती संजय पासी हे मोठे उद्योगपती आहेत. तिचे पती पास्को ग्रुपचे चेअरमॅन आहेत.

2690 कोटींची मालकीण

भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये त्यांची गणना केली जाते. तसेच शालिनी आणि संजय यांच्या संयुक्त संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर ती 2690 कोटींची मालकीण आहे. मुख्य म्हणजे शालिनी अभिनेता शाहरुख खान आणि गौरी खानची खास मैत्रीण आहे. भरपूर पार्ट्यांमध्ये ते एकत्र दिसतात.शालिनीला फक्त बिझनेसमध्ये नाही तर, गायन, संगीत, स्कुबा डायव्हिंग आणि डान्सिंगमध्ये खूप रस आहे.

रिपोर्टनुसार शालिनी पासी यांनी खुलासा केला की ती रिॲलिटी शोमधून तिची सर्व कमाई युनिसेफच्या माध्यमातून बिहारमधील एका गावात दान करते. तिने सांगितले की त्यांची सर्व कमाई विविध धर्मादाय संस्थांना निधी देण्यासाठी वापरली जाते. ती म्हणाली, ‘हा प्रश्न मी प्रत्येकाला विचारत आहे, मी इथे का जन्मले? माझा उद्देश काय आहे? माणूस म्हणून तुम्ही तुमचे सर्वोत्तम काम करता. माझी संपूर्ण अभिनय फी युनिसेफच्या माध्यमातून बिहारमधील एका गावात जाते. मी जे काही करते, माझी सर्व कमाई दानात जाते” असं तिने सांगितलं आहे. यासाठी तिचे सर्वत्र कौतुकही होते.

शालिनी पासीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की, शालिनीची बिग बॉस 18 मध्ये एन्ट्री होणार आहे. दिल्लीची आर्ट डिझाईन कलेक्टर आणि रिॲलिटी शो क्वीन शालिनी या सीझनमध्ये वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून दिसणार आहे.