मुंबई : बॉलिवूड लेखक-संकलक अपूर्व असरानी (Apurva Asrani) याने समलिंगी पार्टनर सिद्धांतपासून विभक्त होक असल्याची घोषणा केली. तब्बल 14 वर्षांच्या रिलेशनशीपनंतर अपूर्व आणि सिद्धांत यांचं ब्रेकअप झालं. एकनिष्ठता आणि रिलेशनशीपविषयीचा एक मेसेज लिहून अपूर्वने आपल्या ब्रेकअपची घोषणा केली. (Bollywood Celebrity Apurva Asrani announces separation from Gay Partner Siddhant after 14 years of relationship)
मैत्रीपूर्ण सेपरेशन
“अत्यंत जड अंतकरणाने मी तुम्हाला सांगू इच्छितो, की मी आणि सिद्धांत विभक्त होत आहोत. आमच्याकडे समलिंगी समुदाय (LGBTQ community) अनेक वर्ष रोल मॉडेल म्हणून पाहत असल्याची मला कल्पना आहे. त्यामुळे अनेक जणांचा रसभंग होईल, पण मी तुम्हाला सांगू इच्छितो, या 14 वर्षांतला प्रत्येक दिवस महत्त्वाचा, मौल्यवान होता. आम्ही अत्यंत मैत्रीपूर्ण आणि शांतपणे सेपरेट होत आहोत” असा मेसेज अपूर्वने लिहिला आहे.
“भारतात समलिंगी जोडप्यांसाठी रोल मॉडेल्स नाहीत. ज्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी, अशा व्यक्ती कमी आहेत. त्यातच आम्ही आमचा वेगळा मार्ग निवडून चूक केली आहे. पण आम्ही आमचं प्रेम उघडपणे स्वीकारणारी भारतातील पहिली पिढी आहोत, त्यामुळे हे लिहिताना मला जराही खेद वाटत नाही” असं अपूर्व लिहितो.
हा कठीण काळ आहे…
“आपण आमच्या प्रायव्हसी आणि भावनांचा आदर राखावा, अशी विनंती आहे. आमच्या नात्याविषयीचे तर्कवितर्क आमच्यावर सोडा. कृपया तुमच्या मेसेजमध्ये आम्हाला टॅग करु नका. हा कठीण काळ आहे. आशेला स्थान आहे, या मुद्द्यावर मला याचा शेवट करायचा आहे. सिदसाठी, माझ्यासाठी, प्रेम आणि सुरक्षित घरकुलाचा शोध घेणाऱ्या प्रत्येकासाठी आशेला वाव आहे.. विश्वास ठेवणं थांबवू नका” असं आर्जव अपूर्वने केलं आहे.
एकनिष्ठतेविषयी मेसेजमुळे तर्कवितर्क
आपल्या ब्रेकअपविषयी सांगण्यापूर्वी शनिवारी सकाळी अपूर्वने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक मेसेज लिहिला होता. “एकनिष्ठता ही ग्रे नसते. ती काळी किंवा पांढरी असते. एक तर तुम्ही पूर्णपणे एकनिष्ठ असता, किंवा अजिबात नसता” या स्टोरीमुळे सिद्धांतने अपूर्वची फसवूणक केल्याचे आराखडे चाहत्यांनी बांधले आहेत.
गेल्याच वर्षी अपूर्व आणि सिद्धांत यांनी गोव्यात एकत्र घर विकत घेतलं होतं. भाड्याच्या घरात गे कपल म्हणून राहताना येणाऱ्या अडचणी त्यांनी सांगितल्या होत्या. बऱ्याच वेळा आपण भावंडं असल्याचं सांगून भाड्याने राहिल्याच्या आठवणीही त्याने सांगितल्या होत्या. अपूर्व आणि सिद्धांत तब्बल 14 वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये होते. (Bollywood Celebrity Apurva Asrani announces separation from Gay Partner Siddhant after 14 years of relationship)
14 years today since we first held hands. We battled a law that criminalized us, a society that rejected us and found solutions to our problems without role models or familial support. We hope the new post 377 India will be kinder to LGBTQ couples. Here’s to more visibility.?❤️ pic.twitter.com/hdSuGhXAQV
— Apurva (@Apurvasrani) February 14, 2021
कोण आहे अपूर्व असरानी?
43 वर्षीय अपूर्व असरानी हा बॉलिवूड लेखक, पटकथा लेखक आणि संकलक
सत्या (1998) सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट संकलनाचा फिल्मफेअर
स्नीप (2000) सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट संकलनाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
शाहीद, सिटीलाईट, धरम संकट में यासारख्या सिनेमांचे संकलन
अलिगढ सिनेमाचे कथा, पटकथा आणि संवाद लेखन
मेड इन हेव्हन या वेब सीरिजसाठीही संकलन
संबंधित बातम्या :
कलाकारांच्या मागे कोरोनाचे शुक्लकाष्ट, आदित्य नारायण-श्वेतालाही कोरोनाची लागण!
(Bollywood Celebrity Apurva Asrani announces separation from Gay Partner Siddhant after 14 years of relationship)