मुंबईः बॉलिवूडचा किंग शाहरूख खान (Shahrukh Khan) याची ईश्वरावरील श्रद्धा सर्वश्रुत आहे. शाहरूख खानने नुकतीच मक्का येथील यात्रा केली. तर रविवारी रात्री तो अचानक कटारा (Katara) येथील वैष्णोदेवीच्या (Vaishno Devi) मंदिरात दिसून आला. चेहरा पूर्ण झाकणारा मास्क होता, पण लाखो-करोडो चाहत्यांच्या नजरेतून सुटेल तो बादशाह कसला… वैष्णोदेवी मंदिरातील एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतोय.
या व्हिडिओत मास्क घालून गेलेल्या व्यक्तींमध्ये शाहरूख खानदेखील आहे, असा दावा करत तो वेगाने शेअर केला जातोय.
शाहरूख खानने रविवारी रात्री वैष्णोदेवी मंदिरात दर्शन घेतल्याचं म्हटलं जातंय. त्याचं कारणही महत्त्वाचंच आहे.
SRK recently visited Mata Vaishnodevi to seek blessings.pic.twitter.com/Cr17b9N7gz
— Shah Rukh Khan Fc – Pune ( SRK Fc Pune ) (@SRKFC_PUNE) December 12, 2022
पुढच्या महिन्यात शाहरूख खानचा पठान हा चित्रपट प्रदर्शित होतोय. चित्रपट यशस्वी होऊ दे, अशी प्रार्थना त्याने वैष्णोदेवीला केली असणार.
रविवारी रात्री आपल्या सहकाऱ्यांसमवेत शाहरूख खान कटारा येथे देवीच्या दर्शनासाठी गेल्याचं दिसून आलंय. सहजासहजी लोकांना ओळखू येऊ नये, असा पेहराव आणि मास्क घातला होता, असं म्हटलं जातंय.
पठान चित्रपटाच्या माध्यमातून किंग खान बॉलिवूडमध्ये तब्बल चार वर्षानंतर एंट्री करतोय. त्यामुळे शाहरूख खानच्या लाखो चाहत्यांना चित्रपटाकडून मोठ्या अपक्षे आहेत. चित्रपटाची घोषणा झाली, तेव्हापासून चित्रपटासंबंधी प्रत्येक अपडेटवर चाहते व्यक्त होत आहेत.
शाहरूख खानने नुकताच या चित्रपटातील बेशर्म या गाण्यातील लूक शेअर केला. त्यावर कॅप्शन होतं.. बोट, सौंदर्य आणि बेशरम रंग.. आज हे गाणे रिलीज होतेय.
फोटोतला शाहरूख खानचा लूक चाहत्यांना घायाळ करणारा आहे. केसांची पोनी आणि गळ्यात लांब सिल्व्हर रंगाची चेन आणि पठानी लूकचा हा फोटो चाहत्यांकडून वेगाने शेअर केला जातोय. त्यावर विविध प्रतिक्रियाही उमटत आहेत.