नवी दिल्ली : अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan)आणि रेखा (Rekha) ही बॉलीवूडची जोडी आहे, ज्यांनी बॉक्स ऑफिसवर एकत्र येऊन अनेक हिट चित्रपट दिले आणि त्या चित्रपटांना प्रेक्षकांनीही दाद दिली. दोघेही मेगा स्टार आहेत, ज्यांच्या प्रेमप्रकरणाच्या कथाही अनेकांनी ऐकल्या होत्या. हजारो चर्चा झाल्या, पण अमिताभ बच्चन यांनी त्यांचे नाते (relationship) कधीच स्वीकारले नाही, तर आपण बिग बींच्या प्रेमात होतो, हे सांगण्यापासून रेखा कधीच मागे हटल्या नाहीत. रेखा आणि बिग बी यांच्या अफेअरची नेहमीच चर्चा होते. याच कारणामुळे बिग बींनी पहिल्यांदा त्यांच्या कुटुंबाची निवड केली आणि रेखासोबत कधीही काम करणार नाही असा निर्णय घेतला.
तुम्हाला या सर्व गोष्टी आधीपासूनच माहिती असतील. पण एकदा अमिताभ यांचा रेखासोबत सेटवर इतका जोरदार वाद झाला की बिग बींनी अभिनेत्रीला थप्पड मारली होती, हे तुम्हाला माहीत आहे का ?
कशामुळे भडकल्या होत्या रेखा ?
खरंतर, हा 80 च्या दशकातील किस्सा आहे. त्यादरम्यान अमिताभ बच्चन यांचे एका सुंदर इराणी डान्सरसोबत नातं आहे, अशी बातमी बी-टाऊनमध्ये पसरू लागली होती. बिग बी त्या सुंदर इराणी डान्सरच्या प्रेमात पडल्याच्या बातम्याही येऊ लागल्या. रेखा यांच्या कानावर ही बातमी पोहोचताच त्या अतिशय रागावल्या. कारण रेखा यांना माहित होते की ती इराणी डान्सर अमिताभ यांच्यासोबत ‘लावारीस’ चित्रपटात काम करत आहे.
अमिताभही भडकले
तेव्हा रेखा यांना वाटले की ही फसवणूक आहे. आपली फसवणूक झाली असे त्यांना वाटत होते. थेट अमिताभ यांच्याशी बोलल्यावरच काही गोष्टी स्पष्ट होतील, असे त्यांना वाटले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमिताभ बच्चन यांच्याशी बोलून हे प्रकरण मिटवण्यासाठी रेखा त्यांच्या चित्रपटाच्या सेटवर पोहोचल्या. तेथे दोघांमध्ये या विषयावर बोलणे सुरू झाले. प्रश्नोत्तरांची फेरी सुरू झाली आणि दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली. या वादामुळे अमिताभ यांचा राग अतिशय वाढला आणि त्यांनी रेखा यांना रागाने थप्पड मारली, असे म्हटले जाते.
रेखा यांनी घेतला मोठा निर्णय
अमिताभ यांचे हे कृत्य रेखा यांना अजिबात आवडले नाही, त्या खूप दुखावल्या गेल्या होत्या. या घटनेनंतर रेखानी ठरवले की त्या अमिताभ आणि जया बच्चन यांच्यासोबत ‘सिलसिला’ चित्रपटात अजिबात काम करणार नाहीत.
यश चोप्रा यांचा शब्द टाळू शकल्या नाहीत रेखा
या घटनेनंतर रेखा यांनी ‘सिलसिला’ या चित्रपटात काम करण्यास साफ नकार दिला होता. मात्र, नंतर चित्रपटाचे दिग्दर्शक यश चोप्रा यांनी रेखा यांना खूप समजावले आणि त्यानंतर रेखा यांनी त्यांच्या सांगण्यावरून चित्रपट करण्यास होकार दिला. हा चित्रपट रेखा आणि अमिताभ यांच्या ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी एक आहे.