मुंबई – बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक केके(singer KK) यांचे काल (मंगळवारी) रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची घटना घडली आहे. केकेच्या अचानक जाण्याने देशभरातील चाहते हळहळ व्यक्त करत आहेत. घटनेनंतर केकेचे कुटुंबीय (Family )कोलकत्याला पोहचले आहे. घटनेनंतर केकेचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी सीएमआरआय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. केके यांचे पार्थिव आज(बुधवार) रात्री 9 पर्यंत मुंबईत( Mumbai)आणण्यात येणार आहे. त्यांच्यावर मुंबईमध्येच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पार्थिवाचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी बॉलीवूडमधील कलाकार, गायक उपस्थित राहणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
केके यांच्या मृत्यूनंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधत सहवदेना व्यक्त केल्या आहेत. केके यांच्या
शवविच्छेदन झाल्यनंतर त्याच्या पार्थिवाला तोफांची सलामी देण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी 5:45 वाजता त्यांचे पार्थिव मुंबईकडे रवाना होणार आहे. कोलकत्यातील रवींद्र सदनात सलामीसाठी त्याचे पार्थिव ठेवण्यात येणार आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी श्रद्धांजली देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
It is saddening that a young man passed away. He was such a good singer. What can I say? Can something be said on something like that?: West Bengal CM Mamata Banerjee in Durgapur on the demise of singer #KK
He passed away last night in Kolkata after a live performance. pic.twitter.com/xC5uuVz6z9
— ANI (@ANI) June 1, 2022
गायका केके यांच्यावर मुंबईतील, वर्सोवा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सायंकाळी कोलकाता येथून पार्थिव मुंबईसाठी रवाना होईल. कोलकाताहून सायंकाळी 5.15 ची फ्लाइट आहे. साधारण रात्री नऊ वाजेपर्यंत ते मुंबईत पोहोचतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Kolkata | Gun salute will not be given at the airport, it will be given in Rabindra Sadan as the postmortem is still going on. We have consulted with the family, they have a 5.15 pm flight so we will pay respect there: West Bengal CM Mamata Banerjee on the demise of singer #KK pic.twitter.com/Vv1a7vxESf
— ANI (@ANI) June 1, 2022
गायक केके एका कॉन्सर्टसाठी कोलकाता येथे गेले होते. लाइव्ह परफॉर्मन्स देत असतानाच . दरम्यान, त्यांची प्रकृती खालावली, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र तोपर्यंत खूप उशीर झालेला होता.