तुटलेला दात, मोठे डोळे; फोटोत दिसणाऱ्या या चिमुकलीला ओळखलं का? आज करतेय बॉलिवूडवर राज्य

| Updated on: Mar 21, 2025 | 12:57 PM

फोटोत दिसणारी ही मुलगी आज बॉलिवूडची सुपरस्टार अभिनेत्री आहे. तिने तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने बॉलिवूडवर राज्य केलं आहे. ही चिमुकली कोणती अभिनेत्री आहे हे ओळखलं का?

तुटलेला दात, मोठे डोळे; फोटोत दिसणाऱ्या या चिमुकलीला ओळखलं का? आज करतेय बॉलिवूडवर राज्य
Ravina Tandon childhood photo
Image Credit source: tv9 hindi
Follow us on

बॉलिवूड सेलिब्रिटींचे जुने आणि बालपणीचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधीकधी चाहते त्यांच्या आवडत्या स्टार्सना जुन्या आणि बालपणीच्या फोटोंमध्ये ओळखतात, पण काहीवेळेला त्यांना ओळखणं कठीण होतं. आता समोर दिसत असलेला हा फोटोच पाहाना. या फोटोत दिसणारी ही चिमुकली आज बॉलिवूडची सुपरस्टार आहे. आज ही एक यशस्वी अभिनेत्री आहे. अनेक हिट चित्रपट या अभिनेत्रीने दिले आहेत. लाखो, करडोनो या अभिनेत्रीचे फॅन आहेत.

पण या ब्लॅक अॅंड व्हाइट फोटोमध्ये दात तुटलेली, मोठे डोळे असणारी ही चिमुकली कोण आहे हे फोटो पाहून पटकन ओळखणं थोडं कठीण जाऊ शकतं. ही अभिनेत्री आहे बॉलीवूडची क्वीन रवीना टंडन आहे. हा फोटो रवीना टंडनच्या बालपणीचा आहे.

रवीनाने स्वतः फोटो शेअर केला आहे

हा फोटो रवीना टंडनने स्वतः फेब्रुवारी 2022 मध्ये तिच्या इंस्टाग्राम हँडलवरून शेअर केला होता. रवीनाने तिच्या वडिलांसोबतचे काही फोटो तिच्या सोशल मीडियावर पोस्ट केले होते.त्यातीलच हा देखील एक फोटो होता. या फोटोमध्ये रवीना तिचे दिवंगत वडील रवी टंडन यांच्यासोबत दिसत आहे.


रवीना बॉलिवूडची सुपरस्टार बनली

रवीनाचे वडील रवी टंडन हे दिग्दर्शक आणि निर्माते होते. त्यांनी अनेक चित्रपट बनवले होते. रवीनाला सुरुवातीपासूनच चित्रपट जगताचे वातावरण घरी मिळाले. ती मोठी झाल्यावर तिने अभिनयाच्या जगात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. तिने 1991 मध्ये आलेल्या ‘पत्थर के फूल’ या चित्रपटातून आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात केली. यानंतर तिने कधीही मागे वळून पाहिले नाही. बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक अशी तिची ओळख आहे. रवीनाने तिच्या काळातील जवळजवळ प्रत्येक मोठ्या अभिनेत्यासोबत स्क्रीन शेअर केली. बॉलिवूड व्यतिरिक्त तिने दक्षिण चित्रपटांमध्येही काम केले आहे. तसेच तिच्या नावावर अनेक हिट चित्रपटही आहे.

रवीनाची मुलगी राशाचेही बॉलिवूडमध्ये पदार्पण

रवीनाने 2004 मध्ये उद्योगपती अनिल थडानीशी लग्न केलं. दोघेही दोन मुलांचे पालक आहेत. रवीनाची मुलगी राशा थडानी आणि मुलगा रणबीर थडानी आहे. रवीनाप्रमाणेच तिची लेक राशाने देखील बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं आहे. राशाने अलिकडेच अजय देवगणच्या ‘आझाद’ चित्रपटातून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.