बॉलीवूड स्टार्स मुंबई आणि इतर मेट्रो शहरांमधील प्राइम लोकेशन्समध्ये प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करत आहेत. मालमत्तेत केलेली सुरक्षित गुंतवणूक हे त्यामागचे मुख्य कारण असल्याचे सांगितले जाते. अमिताभ बच्चनपासून ते तृप्ती डिमरीपर्यंत सर्वजण प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेत आहेत.
बॉलिवूड स्टार्सची रिअल इस्टेटमध्ये मोठी गुंतवणूक
बॉलिवूड स्टार्स त्यांच्या लक्झरी लाइफस्टाइल आणि लक्झरी प्रॉपर्टीजसाठी नेहमीच चर्चेत असतात. अलिकडच्या काही महिन्यांत अनेक नामवंत स्टार्स आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मुंबई आणि आसपासच्या परिसरात प्रचंड मालमत्ता खरेदी केल्याच्या चर्चा आहेत. या यादीत अमिताभ बच्चन आणि तृप्ती डिमरी यांच्यासह अनेक कलाकारांचा समावेश आहे.
रिअल इस्टेटमध्ये मोठी गुंतवणूक करणारे सेलिब्रिटी कोण आहेत ते पाहुयात
अमिताभ आणि अभिषेक बच्चन
अमिताभ बच्चन यांनी सप्टेंबरमध्ये इटर्निया, मुलुंड पश्चिम येथे 2.54 कोटींची मालमत्ता खरेदी केली आहे. ज्यासाठी त्यांनी 15.23 लाख शुल्क भरले आहे. तर, मुलगा अभिषेक बच्चन यानेही याच इमारतीत 2.22 कोटी रुपयांची मालमत्ता खरेदी केली आणि 13.33 लाख मुद्रांक शुल्क भरले आहे.
कंगना राणौत
अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौतने ओशिवरा येथे 1.56 कोटींची मालमत्ता खरेदी केली, ज्यासाठी तिने 9.3 लाख मुद्रांक शुल्क भरले आहे. सध्या कंगना चित्रपटांपासून दूर आहे आणि राजकारणात जास्त सक्रिय आहे. यासोबतच ती सतत प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करत आहे.
शाहिद कपूर
चॉकलेट बॉय म्हणून प्रसिद्ध असलेल्या शाहिद कपूरने 360 वेस्ट ओबेरॉय रियल्टी, लोअर परेलमध्ये 58.66 कोटींची मालमत्ता खरेदी केली. त्यासाठी त्याने 1.7 कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरले.
तृप्ती डिमरी आणि आमिर खान
‘ॲनिमल’ फेम अभिनेत्री तृप्ती डिमरी हिने जूनमध्ये कार्टर रोड, वांद्रे येथे 14 कोटी रुपयांची मालमत्ता खरेदी केली होती. तसेच, चित्रपटांपासून ब्रेकवर असलेल्या आमिर खानने वांद्रे येथील बेला विस्टा अपार्टमेंटमध्ये 9.76 कोटी किमतीचे अपार्टमेंट खरेदी केले आहे यासाठी त्याने 58.54 लाख मुद्रांक शुल्क भरले आहे.
दीपिका पदुकोण आणि अंजू सिंग
अभिनेत्री दीपिका पदुकोणने तिचे वडील प्रकाश पदुकोण यांच्यासोबत वांद्रे येथे 17 कोटी रुपयांची मालमत्ता खरेदी केली आहे. यानंतर, तिचा पती रणवीर सिंगची आई अंजू सिंग यांनी देखील त्याच इमारतीत 19 कोटी रुपयांचा फ्लॅट खरेदी केला आहे. यासाठी त्यांनी 95 लाख रुपये मुद्रांक शुल्क भरले आहे.
बॉलीवूड स्टार्स मुंबई आणि इतर मेट्रो शहरांमधील प्राइम लोकेशन्समध्ये प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करत आहेत. मालमत्तेत केलेली सुरक्षित गुंतवणूक हे त्यामागचे मुख्य कारण असल्याचं म्हटलं जात आहे.