हनिमूनला निघताच अरबाज खान आणि शूरा खान यांचा तो व्हिडीओ व्हायरल, थेट गुडघ्यावर बसून

| Updated on: Dec 31, 2023 | 9:48 PM

शूरा खान हिच्यासोबत लग्न झाल्यानंतर आता अरबाज खान हा हनिमूनला गेलाय. शूरा खान आणि अरबाज खान यांचे हनिमूनला जातानाचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले. सध्या सोशल मीडियावर शूरा खान आणि अरबाज खान यांचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. विशेष म्हणजे चाहत्यांना यांचा हा व्हिडीओ जबरदस्त आवडल्याचे देखील बघायला मिळतंय.

हनिमूनला निघताच अरबाज खान आणि शूरा खान यांचा तो व्हिडीओ व्हायरल, थेट गुडघ्यावर बसून
मलायका अरोरा, जॉर्जिया अँड्रियानी, अरबाज खान
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई : अरबाज खान हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. अरबाज खान याच्या काही दिवसांपूर्वीच अफेअरची जोरदार चर्चा होती. अफेअरची चर्चा असतानाच थेट अरबाज खान याने शूरा खान हिच्यासोबत लग्न केले. अरबाज खान याच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे अरबाज खान याने काही दिवस शूरा खान हिला डेट करून लग्न करण्याचा निर्णय घेतला. अरबाज खान आणि शूरा खान यांच्या निकाहाला अत्यंत जवळचे नातेवाईक आणि काही मित्र मंडळी उपस्थित होते. अरबाज खान हा लग्नामध्ये धमाका करताना दिसला. या लग्नातील काही फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले.

हा व्हिडीओ लग्नाच्या अगोदरचा असल्याचे सांगितले जातंय. या व्हिडीओमध्ये अरबाज खान हा अत्यंत रोमॅंटिक मूडमध्ये दिसतोय. अरबाज खान हा व्हिडीओमध्ये गुडघ्यावर बसून शूरा खान हिला लग्नासाठी प्रपोज करताना दिसतोय. यावेळी अरबाज खान याच्या हातामध्ये मोठा फुलांचा बुके दिसत आहे. यावेळी त्याचे कुटुंबिय देखील उपस्थित आहेत.

 

अरबाज खान हा सर्वात अगोदर गुडघ्यावर बसतो आणि शूरा खान हिला लग्नासाठी प्रपोज करतो. यानंतर तो शूरा खान हिला रिंग घालताना देखील दिसत आहे. यानंतर दोघे एकमेकांची गळाभेट घेत किस करतात. या व्हिडीओमध्ये सर्वात विशेष बाब म्हणजे चक्क यावेळी अरबाज खान आणि मलायका अरोरा यांचा लेक अरहान खान हा देखील दिसत आहे.

अरहान खान हाच नाही तर अरबाज खान याच्या कुटुंबातील इतरही काही सदस्य हे उपस्थित दिसत आहेत. अरबाज खान याची बहीण अर्पिता खान देखील बुके पकडताना दिसत आहे. असे सांगितले जातंय की, हा व्हिडीओ 19 डिसेंबरचा आहे. शूरा खान आणि अरबाज खान यांनी 24 डिसेंबर 2023 रोजी बहीण अर्पिता हिच्या घरी लग्न केले.