अभिनेता बालाने त्याच्यापेक्षा 18 वर्षांनी लहान असलेल्या आपल्याच भाचीसोबत लग्न केलं आहे. हे त्याचं तिसरं लग्न आहे. या लग्नाला कुटुंबातून विरोध होत असताना देखील त्याने आपल्यापेक्षा वयानं 18 वर्षांनी लहान असलेल्या भाचीसोबत लग्न केलं. यावर प्रतिक्रिया देताना त्याने म्हटलं आहे की मी माझ्या वैवाहिक जिवनामध्ये खूप आनंदी आहे. आता आम्ही आमच्या पहिल्या अपत्याच्या प्रतीक्षेत आहोत. त्याने आपल्या एका मुलाखतीमध्ये म्हटलं की मी माझ्या वैवाहिक जीवनामध्ये इतका खूश आहे की मी राजा सारखं माझं आयुष्य जगत आहे आणि माझी पत्नी देखील रानी सारखं आयुष्य जगत आहे. माझ्यासोबत सगळं चांगलं घडत आहे, जे माझ्यावर जळतात त्यांना जळू द्या, कारण मी त्यांना काहीच करू शकत नाही, ती त्यांची चूक आहे.
‘बैड ब्यॉज फेम अभिनेता बालाने आपल्यापेक्षा तब्बल 18 वर्षांनी लहान असलेली आपली भाची कोकिळासोबत लग्न केलं. हे त्याचं तिसरं लग्न आहे. यावर बोलताना एका मुलाखतीमध्ये तो म्हणाला की जे लोक माझ्यावर जळतात, त्यांना प्रत्येकामध्ये काहीना काही वाईट गोष्ट दिसते. जळणं त्यांचं कामच आहे, त्याला मी काहीच करू शकत नाही. कोकीळा 24 वर्षांची होती ती काही दिवस माझ्या घरी होती, तेव्हा मला तिच्यासोबत प्रेम झालं, आणि आम्ही लग्नाचा निर्णय घेतला.
अभिनेता बालाची तिसरी पत्नी कोकिळाने यावर बोलताना सांगितलं की, मामा बऱ्याच दिवसांपासून सिंगल होते. माझंही त्यांच्यावर प्रेम होतं. ते आपल्या लहाणपणापासूनच प्रत्येकाची मदत करत आले आहेत. मामाचा हाच स्वभाव मला आवडला आणि मी त्यांच्याशी लग्न केलं. अभिनेता बालानं म्हटलं की कोकीळा आपली प्रत्येक भावना एका डायरीमध्ये लिहीत होती, तिची डायरी वाचल्यानंतर मला ती आवडू लागली, आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो आणि लग्न केलं.
दरम्यान अभिनेता बालाचं पहिलं लग्न हे पेशानं गायक असलेल्या अमृता सुरेशसोबत झालं होतं. मात्र 2019 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर त्यांनी डॉक्टर असलेल्या एलिजाबेथ यांना आपला लाईफ पार्टनर बनवलं. त्यानंतर त्याने आता तिसरं लग्न आपल्याच भाचीसोबत केलं, 23 ऑक्टोबरला त्यांनी लग्न केलं.