मुकेश खन्ना यांचा संताप! कपिल शर्मा निशाण्यावर, महिलांचे कपडे घालून…

| Updated on: Aug 06, 2024 | 10:23 PM

मुळात म्हणजे मुकेश खन्ना हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. विषय कोणताही असो ते आपले मत स्पष्टपणे मांडताना दिसतात. मुकेश खन्ना यांना आजही लोक शक्तीमान या नावाने ओळखतात. त्यांनी अभिनय क्षेत्रामध्ये अत्यंत मोठा काळ गाजवला आहे. मालिकांसोबतच त्यांनी चित्रपटांमध्येही भूमिका केल्या आहेत. आता थेट मुकेश खन्ना यांच्या निशाण्यावर कपिल शर्मा याच्या शो दिसतोय. मुकेश खन्ना हे खडेबोल सुनावताना दिसत आहेत.

मुकेश खन्ना यांचा संताप! कपिल शर्मा निशाण्यावर, महिलांचे कपडे घालून...
Follow us on

अभिनेते मुकेश खन्ना अर्थात ‘शक्तीमान’ हे नेहमीच चर्चेत असतात. मुकेश खन्ना सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसतात. सोनाक्षी सिन्हा हिने झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केल्यानंतर तिच्यावर जोरदार टीका केली जात होती. लव्ह जिहाद असल्याचा दावा अनेकांनी केली. त्यावेळी सोनाक्षी सिन्हा हिच्या समर्थनार्थ मुकेश खन्ना हे मैदानात उतरल्याचे बघायला मिळाले. त्यांनी स्पष्ट म्हटले होते की, ते लग्न लव्ह जिहाद नाहीये. झहीर आणि सोनाक्षी सात ते आठ वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. एक वर्ष किंवा त्यापेक्षा कमी कालावधीमध्ये जी लग्न दबाव टाकून केली जातात ती लव्ह जिहाद असल्याचे मुकेख खन्ना यांनी म्हटले आहे.

आता थेट मुकेश खन्ना यांच्या निशाण्यावर कपिल शर्मा याच्या शो दिसतोय. मुकेश खन्ना हे खडेबोल सुनावताना दिसत आहेत. मुकेश खन्ना यांनी म्हटले की, मला अजिबात आवडत नाही की, महिलांची कपडे पुरूषांनी घालावीत आणि नाटक करून नाचावे. पण एक शो आहे, ज्याचे नाव मला घ्यायचे नाहीये. तिथे कॉमेडीच्या नावावर हे सर्व प्रकार सुरू असतात. मुकेश खन्ना यांच्या या पोस्टवर उत्तर देताना अली असगरने म्हटले की, मी त्यावर काय बोलू, ते त्यांचे वैयक्तिक मत आहे. यासोबतच अली असगरने काही गोष्टी देखील स्पष्ट केल्या. कपिल शर्माच्या शोमध्ये अली हाच महिलांचे कपडे आणि दागिने घालून कॉमेडी करताना दिसतो. तेच मुकेश खन्ना यांना अजिबात पटले नसल्याचे दिसत आहे.

नसीरुद्दीन शाह याच्यावर काही दिवसांपूर्वीच भडकताना मुकेश खन्ना हे दिसले होते. मुकेश खन्ना यांनी थेट लव्ह जिहादला प्रोत्साहन देणाऱ्या गॅंगमध्ये सहभागी व्हा असेच नसीरुद्दीन शाह यांना म्हटले होते. नसीरुद्दीन शाह यांनी मुस्लिमांविरोधात नफरत निर्माण करणे ही एक नवीन फॅशन तयार झालीये, असे म्हटले होते. त्यावरून नसीरुद्दीन शाहवर मुकेश खन्ना हे भडकले होते.