बिग बॉस ओटीटी 3 चा नुकताच फिनाले झालाय. सना मकबूल ही बिग बॉस ओटीटीची विजेता ठरलीये. मात्र, सना मकबूल ही विजेता झाल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. बिग बॉसच्या घरात सुरूवातीपासूनच काही खास गेम खेळताना सना मकबूल दिसली नाही. सर्वांनाच वाटत होते की, रणवीर शाैरी हा बिग बॉस ओटीटी 3 चा विजेता होईल. सना मकबूल ही बिग बॉस ओटीटी 3 ची विजेता झाल्यापासून अनेकांनी थेट बिग बॉसच्या निर्मात्यांनाच टार्गेट करण्यास सुरूवात केलीये. सना मकबूल ही बिग बॉसची विजेता झाल्यानंतर घरातील इतर सदस्यांना देखील मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळाले. बिग बॉसच्या निर्मात्यांवरही गंभीर आरोप केले जात आहेत.
आता नुकताच रणवीर शाैरी यांनी एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये अनेक प्रश्न रणवीर शाैरी यांना विचारण्यात आले. यामधील एक प्रश्न त्यांना असा विचारण्यात आला की, त्यांचा पारा चढल्याचे बघायला मिळाले. या प्रश्नानंतर त्यांनी मुलाखत संपल्याचेही जाहीर केले. आपण पुन्हा भेटू असेही रणवीर शाैरी शेवटी म्हणाले. याची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. नेमका तो प्रश्न कोणता होता ते जाणून घ्या.
रणवीर शाैरी यांना विचारण्यात आले की, तुम्ही बिग बॉसच्या घरात दाखल झाल्यानंतर तुमच्या काही जुन्या मुलाखती व्हायरल होत आहेत, त्यापैकी एका मुलाखतीमध्ये तुम्ही म्हटले आहे की, बॉलिवूड गॅंगने तुम्हाला साईडलाईन केले. यामुळेच तुम्हाला काम मिळत नाहीये. तुमच्यावर पूजा भट्ट हिला मारहाण केल्याचाही आरोप आहे.
हे ऐकताच रणवीर शाैरी हे चांगलेच भडकल्याचे बघायला मिळतंय. ते थेट म्हणाले की, चला आता बस करा. तुम्हाला मी नंतर भेटतो आणि त्यांनी पुढे काही बोलले नाही. अनेकांनी रणवीर शाैरी यांची बाजू घेतल्याचे देखील बघायला मिळतंय. चाहते हे सतत रणवीर शाैरी यांना सपोर्ट करताना दिसत आहेत. अनेकांनी म्हटले की, रणवीर शाैरी हेच बिग बॉस ओटीटीचे विजेते आहेत.
रणवीर शाैरी हे बिग बॉस ओटीटीच्या घरात सुरूवातीपासूनच चांगला गेम खेळताना दिसले. हेच नाहीतर बिग बॉसने दिलेला शेवटचा टास्क देखील त्यांनी धमाकेदार खेळला आणि आपल्या टीमला विजयी केले. सना मकबूलची विजेता होण्याची पात्रता नाही. परंतु बिग बॉस आणि लोकांच्या निर्णयाचा मी सन्मान करत असल्याचं रणवीर शाैरी म्हणाले.