मुंबई : सध्या साक्षी मर्डर प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला आहे. साक्षीच्या हत्येनंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली असून संताप व्यक्त केला जातोय. तसंच साक्षीच्या हत्येचा व्हिडीओ सगळीकडे व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून कोणी एवढ्या निर्दयीपणे कोणाची कशी हत्या करू शकतो, असा विचार मनात येतोच. तसंच या संदर्भात आता अभिनेता सोनू सूदने एक ट्विट केलं आहे ज्याची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.
सोनू सूद हा रिल लाईफ हिरो सोबतच रिअल हिरो देखील आहे. तो कोरोना काळात लोकांच्या मदतीला धावून आला होता, त्यामुळे लोक त्याला देव मानतात. तसंच आता सोनू सूदने साक्षी हत्या प्रकरणावर भाष्य केलं आहे. यासंदर्भात त्यानं एक ट्विट केलं आहे. तर सोनूनं या ट्विटमध्ये नेमकं म्हटलंय?
Wish someone had the guts to kick that guy hard who stabbed an unfortunate 16year old Sakshi in Delhi.
Being a spectator & ignoring the crime happening around u is such a cowardly act.
Parents lost their daughter not bec some Sahil stabbed their daughter..it’s Bec no one came…— sonu sood (@SonuSood) May 31, 2023
दिल्लीतील 16 वर्षीय साक्षीवर चाकूने वार करणाऱ्या साहिलला लाथ मारून बाजूला करायची हिम्मत करायला कोणीतरी करायला हवी होती. गुन्हा घडताना पाहणं आणि त्याकडे दुर्लक्ष करणं हे भ्याडपणा आहे. एका पित्याने आपली मुलगी गमावली कारण साहिलने तिला मारलं नाही तर तिला वाचवण्यासाठी कुणी पुढे आलं नाही, असं सोनू सूद याने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, ही भयानक घटना शनिवारी घडली. आरोपी साहीलने साक्षीवर चाकूने 16 वार केले. एवढंच नाही तर त्याने तिची दगडाने ठेचून हत्या केली. या भयानक हत्याकांड प्रकरणातील आरोपी साहिल खानला सोमवारी उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर येथून अटक करण्यात आली. त्याच्या मनात कुठलीही पश्चातापाची भावना नाहीय. या घटनेनंतर संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे.