अभिनेत्री दलजीत काैर ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. दलजीत काैर हिने दहा महिन्यांपूर्वीच केनियाचा व्यावसायिक निखिल पटेल याच्यासोबत लग्न केले. विशेष म्हणजे भारतामध्ये अत्यंत खास पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडला. अनेक कलाकार हे दलजीत काैर हिच्या लग्नासाठी पोहोचले होते. दलजीत काैर ही निखिल पटेल याच्यासोबतच्या लग्नानंतर केनियाला आपल्या मुलासोबत शिफ्टही झाली. निखिल पटेल याच्यासोबतचे हे लग्न दलजीतचे दुसरे लग्न होते. तिचे पहिले लग्न अभिनेता शालिन भनोट याच्यासोबत झाले. मात्र, काही वर्षांनी यांचा घटस्फोट झाला. शालिन भनोट आणि दलजीत काैर यांचा एक मुलगा देखील आहे.
निखिल पटेल याने तिला एक कायदेशीर नोटीसही पाठवली. दलजीत काैर आणि निखिल पटेल यांच्यातील वाद वाढलाय. दलजीत काैर हिने निखिल पटेल याच्या विरोधात पोलिसांमध्ये धाव घेतली. निखिल पटेल याने दलजीत काैर हिच्यासोबत झालेले लग्न मान्य करण्यासही नकार दिलाय. आता निखिल पटेल याने एक पोस्ट शेअर करत दलजीत काैर हिच्यावर गंभीर आरोप केले. त्या आरोपांना उत्तर देताना दलजीत काैर ही दिसली. हेच नाही तर आता दलजीत काैर हिने निखिल पटेल याच्यावर गंभीर आरोपही केलाय. दलजीत काैरने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, तुझ्या पेड पीआरचा वापर कर आणि मला सांग कधी मला माझे चॅनल परत मिळेल. विचार त्यांना तुझे बँक खाते माझ्या चॅनलशी जोडलेले गेलेले. निखिल पटेल तुला काय गरज पडली त्या मुलाचे चॅनल हडप करण्याची जिच्यासोबत लग्न न करण्याचा दावा तू केलाय.
तिच्या मुलासोबतही तुला काही देणे घेणे नाहीये. मला माझे अकाऊॅंट वापस हवे आहे. माझ्या चॅनेलवरून तुझे बँक खाते काढून टाक. हेच नाही तर दलजीत काैर हिने केन्याच्या कंपनीकडे मदत देखील मागितली आहे. आता दलजीत काैर हिच्या या आरोपांवर निखिल पटेल हा काय उत्तर देतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे. यांच्यातील वाद हा वाढताना दिसतोय.