कपिल शर्माच्या कॉमेडी शोचा भाग असलेली अभिनेत्री उपासना सिंहने आपली एक वेगळी ओळख बनवली आहे. कॉमेडी नाईट वीद कपिल शोमध्ये तीने ‘कपिल की बुआ’ची भूमिका साकारली आहे. या भूमिकेनं तिला एक वेगळी ओळख मिळून दिली. तीने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ज्यामध्ये ‘जुडवा’ ‘जुदाई’, ‘मैं प्रेम की दीवानी हूं’ अशा अनेक चित्रपटांचा समावेश आहे. दरम्यान तिचा एक इंटरव्ह्यू सध्या चर्चेचा विषय बनला आहे. ज्यामध्ये तीने तिच्यासोबत घडलेला कास्टिंग काउचचा अनुभव शेअर केला आहे. मला एका साउथ डायरेक्टरने जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला होता, तो माझ्या वडिलांच्या वयाचा होता असं तीने म्हटलं आहे.
उपासन सिंह अनेक दिवसांपासून टीव्ही इंडस्ट्रीपासून दूर आहे. मात्र नुकतीच तीने सिद्धार्थ केननला एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तीने तिला तिच्या फिल्म करिअरमध्ये आलेले वेगवेगळे अनुभव सांगितले. सोबतच तिने अनेक खळबळजनक खुलासे देखील केले आहेत. तीने याच मुलाखतीत तिला आलेला कास्टिंग काउचचा अनुभव सांगितला आहे.
उपासन सिंहने आपला कास्टिंग काउचचा अनुभव सांगाता म्हटलं की, एक साऊथ फेमस डायरेक्टर आहे, जो मला अनिल कपूरच्या अपोझिट कास्ट करणार होता. त्यामुळे मी खूप आनंदी होते. मात्र मी जेव्हा पण या डायरेक्टरला भेटण्यासाठी जायचे तेव्हा माझ्यासोबत माझी आई किंवा बहीण यापैकी एक कोणीतर असायचं मात्र याचा त्या डायरेक्टरला राग येत होता, त्याने मला विचारलं की तू तुझ्या आईला आणि बहिणीला सोबत का आणतेस, एक दिवस त्याचा मला रात्री 11.30 वाजता फोन आला आणि तो म्हणाला
सिटिंग साठी हॉटेलमध्ये ये.
तेव्हा मी त्याचं बोलणं टाळलं, माझ्याकडे गाडी नव्हती तेव्हा मी त्याला म्हटलं की, आपण स्टोरी उद्या ऐकू तर तो मला म्हटला की तुला सिटिंगचा अर्थ कळला नाही का? तेव्हा मला धक्काच बसला, मला रात्रभर झोप लागली नाही, सकाळी मी थेट त्याच्या ऑफिसमध्ये पोहोचले आणि त्याला पंजाबीमधून शिव्या दिल्या. मला वाईट वाटत होतं कारण मी अनिल कपूरच्या अपोझिट कास्ट होणार होते, मी हे सर्वांना सांगितलं होतं. त्यानंतर मी रात्रभर रडत होते, स्वत:ला सात दिवस घरात कोंडून घेतलं होतं, असं तीने म्हटलं आहे.