मुंबई : मलायका अरोरा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा 2017 मध्ये घटस्फोट झाला. मलायका अरोरा आणि अरबाज खान यांच्या घटस्फोटानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. मात्र, मलायका अरोरा हिने किंवा अरबाज खान यांनी कधीच त्यांच्या घटस्फोटाचे नेमके कारण काय हे सांगितले नाही. मलायका अरोरा हिने अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर ती अर्जुन कपूर याला डेट करत आहेत. इतकेच नाही तर मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे कायमच एकमेकांसोबतचे खास फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात.
अरबाज खान याच्या लग्नाला मलायका अरोरा ही हजर नव्हती. मात्र, तिचा आणि अरबाज खानचा मुलगा अरहान खान उपस्थित होता. नुकताच मलायका अरोरा हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. आता या पोस्टची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. अनेकांनी या पोस्टचा आणि अरबान खान याच्या लग्नाची संबंध जोडला आहे.
मलायका अरोरा हिने इंस्टा स्टोरीला एक पोस्ट शेअर करत लिहिले की, मी उठले, माझ्याजवळ घालण्यासाठी कपडे, पिण्यासाठी पाणी, खाण्यासाठी अन्न, मी आभारी आहे. आता मलायका अरोरा हिची ही पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. मलायका अरोरा हिची ही पोस्ट बरेच काही बोलून जाताना दिसत आहे.
नुकताच मलायका अरोरा हिने तिच्या लग्नाबद्दल देखील मोठा खुलासा केलाय. मलायका अरोरा हिला दुसऱ्यांदा लग्न करणार का? असे विचारण्यात आले. यावर मलायका अरोरा थेट म्हणाली की, जर कोणी असेल तर का नाही 100 टक्के करेल. यामुळेच मलायका अरोरा देखील अरबाज खान याच्यानंतर दुसऱ्यांदा लग्न बंधनात अडकणार का हा प्रश्न सातत्याने सोशल मीडियावर विचारला जातोय.