बॉलिवूडमध्ये अशा अनेक जोड्या आहेत ज्यांची चर्चा आजही होते. तसेच ज्यांनी त्यांच्या प्रेमाची कबुली ही सर्व जगासमोर दिली होती. यातीलच अशी एक अभिनेत्री जी एका अभिनेत्याच्या एवढी प्रेमात होती की तिने चक्क लग्नासाठी आणि प्रेमासाठी करिअर सोडण्याचा निर्णय घेतला होता. एखाद्याच्या अखंड प्रेमात बुडणे म्हणजे काय हे त्या अभिनेत्रीकडे पाहून समजत होतं. पण लग्नानंतर या अभिनेत्रीचं आयुष्यच उद्धवस्थ झालं. आणि झाला तो सर्वात मोठा प्रेमभंग.
घटस्फोटानंतर तर ही अभिनेत्री खचली होती
घटस्फोटानंतर तर ही अभिनेत्री पूर्णत: खचली होती. पण काळी काळानंतर तिने जे दमदार कमबॅक केलं त्याला तोड नाही. सध्या ही अभिनेत्री टीव्ही इंडस्ट्रीतील एक सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री आहे. आपण ज्या अभिनेत्रीबद्दल बोलतोय ती अभिनेत्री म्हणजे जेनिफर विंगेट. जेनिफर विंगेटची वाढती क्रेझ सर्वांनाच माहित आहे. तिच्या सौंदर्यापासून ते तिच्या अभिनयापर्यंत सर्वांनाच भूरळ आहे.
कधी काळी टीव्ही जगतात जेनिफर विंगेट आणि करण सिंग ग्रोव्हर ही जोडी सर्वाधिक चर्चेत होती. दोघांनी ‘दिल मिल गए’ या वैद्यकीय मालिकेत एकत्र काम केले आणि त्यावेळी त्यांचे प्रेम फुलले. 2012 मध्ये त्यांनी लग्न केले, मात्र दोनच वर्षांत त्यांचे नाते तुटले आणि 2014 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला.
प्रेमासाठी सोडले करिअर?
जेनिफर विंगेटने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिची प्रेमासाठी करिअर सोडण्याचीही तयारी होती. तिने सांगितले, “माझ्या आजूबाजूच्यांनी अनेकदा मला हे सांगितलं होतं की या नात्यात पडू नकोस, पण मी कुणाचंच ऐकलं नाही. जर मला काम मिळालं नाही तरीही मला काही हरकत नव्हती. मी गृहिणी होण्यासाठी तयार होते.” पण त्यांचे नाते फार काळ काही टिकले नाही. शेवटी त्यांचा घटस्फोट झाला आणि ते वेगळे झाले.
घटस्फोटानंतर करिअरवर लक्ष देत दमदार कमबॅक केलं
घटस्फोटानंतर जेनिफरने आपल्या करिअरवर लक्ष देत दमदार कमबॅक केलं. जेनिफर आज टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय आणि महागड्या अभिनेत्रींपैकी एक आहे. जेनिफरने लहान वयातच अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. ती पहिल्यांदा आमिर खान आणि मनीषा कोईराला यांच्या ‘अकेले हम अकेले तुम’ (1995) या चित्रपटात झळकली. तसेच ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या ‘कुछ ना कहो’ (2003) मध्येही ती दिसली. त्यानंतर तिने ‘शाका लाका बूम बूम’ (2002) मालिकेद्वारे टीव्हीमध्ये प्रवेश केला. तिच्या ‘कसौटी जिंदगी की’, ‘सरस्वतीचंद्र’, आणि ‘बेहद’ यांसारख्या मालिकांनी तिला मोठी लोकप्रियता मिळवून दिली.
करणनेही टीव्ही आणि चित्रपट दोन्ही क्षेत्रांत काम केले. जेनिफरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर त्याने 2016 मध्ये अभिनेत्री बिपाशा बसूशी लग्न केलं. जेनिफर आणि करण आता एकत्र नसले तरी त्यांच्या चाहत्यांमध्ये आजही ‘दिल मिल गए’ची क्रेझ कायम आहे.