मुंबई : सोशल मीडियावर स्क्रोल केल्यावर सध्या अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांच्या लग्नाचेच फोटो पहायला मिळत आहेत. रणबीर-आलियाने 14 एप्रिल रोजी ‘वास्तू’ या बंगल्यात लग्नगाठ बांधली. लग्नाला त्यांचे मोजकेच जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. अनेकांनी सोशल मीडियावर रणबीर-आलियासाठी पोस्ट लिहिली आहे. त्यातच या दोघांच्या बॉडीगार्ड्सनी (bodyguards) लिहिलेल्या पोस्टने विशेष लक्ष वेधून घेतलं आहे. आलियाचा बॉडीगार्ड युसूफ इब्राहिम (Yusuf Ibrahim) आणि रणबीरचा बॉडीगार्ड सुनील तळेकर (Sunil Talekar) यांनी दोघांसाठी पोस्ट लिहिली आहे. तेव्हापासूनच हे दोघे कोण आहेत? अशी चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. त्याच्या विषयी जाणून घेऊयात…
सुनील तळेकर आणि युसूफ इब्राहिम या दोघांनी आलिया आणि रणबीरच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळली. सुनील तळेकर हे प्रसिद्ध बॉडीगार्ड आहेत. ते आधीपासूनच रणबीर कपूरसाठी काम करतात. सुनील तळेकर हे आधीपासूनच रणबीरचे बॉडीगार्ड म्हणून काम करत आहे. आलियाचं लग्न झाल्यानंतर ते भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. सुनील यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. सुनील यांनी त्यांच् इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं की,’लहानपणापासून तुझ्या लहान हातांना पकडून चालवण्यापासून ते आज तुला वराच्या रुपात पाहिलं. माझं हृदय आनंदानं भरून गेलं आहे.’ सुनील यांनी लिहिलेल्या या पोस्टला आलियानं देखील लाईक केलं आहे.
आलिया भट्टच्या संरक्षणाची जबाबदारी युसूफ इब्राहिम आणि सुनील तळेकर यांच्यावर आहे.युसूफ इब्राहिम य़ांची मुंबईत स्वतःची सुरक्षा एजन्सी आहे. त्यांनीही लग्नानंतर आलिया रणबीरसोबतचा फोटो सेअर केला होता. रणबीर आणि आलियासोबतचा फोटो पोस्ट करत युसूफ यांनी लिहिलं, ‘मुबारक मिस्टर अँड मिसेस कपूर’ अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.
गेल्या महिन्याभरापासून कलाविश्वात आलिया आणि रणबीरच्या लग्नाची चर्चा रंगत होती. अखेर गुरुवारी (14 एप्रिल) संध्याकाळी हे दोघं लग्नबंधनात अडकले. रणबीर कपूरच्या मुंबईतील ‘वास्तू’ या बंगल्यात हा लग्नसोहळा पार पडला. यावेळी कपूर आणि भट्ट कुटुंबातील मोजके पाहुणे आणि बॉलिवूडमधील काही तारे-तारका उपस्थित होते. सुनील तळेकर आणि युसूफ इब्राहिम या दोघांनी आलिया आणि रणबीरच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळली.
संबंधित बातम्या