मुंबई : चंकी पांडेची लेक अनन्या पांडे ही सातत्याने चर्चेत असणारे एक नाव आहे. अनन्या पांडे सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना अनन्या पांडे दिसते. काही दिवसांपूर्वीच अनन्या पांडे हिने मुंबईमध्ये अलिशान असा फ्लॅट खरेदी केला. आपल्या घराची झलक दाखवताना अनन्या पांडे ही दिसली. अनन्या पांडेचा काही दिवसांपूर्वीच लाईगर हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, हा चित्रपट फ्लॉप झाला. अनन्या पांडे हिच्यावरच याचे खापर फोडले गेले. अनन्या पांडे ही काही दिवसांपूर्वी आयुष्मान खुराना याच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसली. मात्र, यांचा जोडीला लोकांना फार काही पसंती दिसली नाही.
अनन्या पांडे ही सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत आहे. अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांचे ब्रेकअप काही दिवसांपूर्वी झाल्याचे सांगितले जातंय. मात्र, अजूनही अनन्या पांडे किंवा आदित्य रॉय कपूर यांनी त्यांच्या ब्रेकअपबद्दल भाष्य केले नाहीये. अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर हे गेल्या काही दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये होते. विदेशाही खास वेळ घालवताना दोघे दिसले होते.
अनन्या पांडे ही अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात धमाल करताना दिसली. मात्र, अनन्या पांडे हिचा लग्नातील एक फोटो व्हायरल होताना दिसतोय. या फोटोमध्ये अनन्या पांडे हिच्यासोबत कोणीतरी मिस्ट्री मॅन दिसत आहे. मिस्ट्री मॅनसोबतचा अनन्या फोटो व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या व्यक्तीसोबत रोमांटिक होताना अनन्या फोटोमध्ये स्पष्ट दिसत आहे.
या व्हायरल होणाऱ्या फोटोनंतर विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. याच मिस्ट्री मॅनला अनन्या पांडे ही डेट करत असल्याचे सांगितले जातंय. विशेष म्हणजे हा मिस्ट्री मॅन अमेरिकन आहे. म्हणजेच काय तर आता आदित्य रॉय कपूर याला विसरून अनन्या पांडे ही आयुष्यात पुढे गेल्याचे दिसत आहे. हा फोटो आता चांगलाच चर्चेत येताना दिसत आहे.