बिग बॉसनंतर आता अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांची जोडी लाफ्टर शेफमध्ये पोहोचली आहे. विशेष म्हणजे यांच्या जोडीला प्रेक्षकांचे प्रेम मिळताना दिसत आहे.
लाफ्टर शेफच्या मंचावर असे काही घडले की, अंकिता लोखंडे भर शोमध्येच विकी जैन याच्यावर चांगलीच भडकली आहे. हेच नाही तर ती विकी जैनचा क्लास लावणार असल्याचे स्पष्ट आहे.
अंकिता लोखंडे म्हणते की, मी खूप जास्त छान फ्राईड राईस बनवला आहे. हे अंकिता जोरजोरात ओरडून बोलत असतानाच तिकडे विकी जैनच्या हातातून फ्राईड राईस सांडतो.
अंकिता लोखंडे ही चांगलीच भडकल्याचे बघायला मिळाले. ती पतीवर ओरडताना देखील दिसत आहे. यावेळी करण कुंद्रा, भारती सिंह हे हसताना दिसत आहेत.
यावेळी भारती सिंह ही मध्यस्थी करताना देखील दिसत आहे. लाफ्टर शेफमधून प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन होताना दिसत आहे.