Video : अरहान खानचा वडिलांच्या दुसऱ्या पत्नीसोबतचा तो व्हिडीओ व्हायरल, दोघेही…

| Updated on: Aug 25, 2024 | 5:20 PM

अरहान खान आणि त्याची सावत्र आई शूरा खान यांच्यामध्ये अत्यंत खास नाते बघायला मिळतंय. अरहान खान आणि शूरा खान यांच्यातील खास नाते व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमधून स्पष्ट दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला पाहायला मिळत आहे.

Video : अरहान खानचा वडिलांच्या दुसऱ्या पत्नीसोबतचा तो व्हिडीओ व्हायरल, दोघेही...
Follow us on

अभिनेता अरबाज खान आणि अभिनेत्री मलायका अरोरा यांचा 2017 मध्ये घटस्फोट झाला होता. अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट घेतल्यापासून मलायका अरोरा ही अर्जुन कपूरला डेट करत आहे. मात्र, यांच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरू आहेत. दुसरीकडे काही दिवसांपूर्वीच अरबाज खान याने शूरा खान हिच्यासोबत लग्न केले. बहीण अर्पिता हिच्या घरी हे लग्न पार पडले. काही वर्ष अरबाज आणि शूरा हे एकमेकांना डेट करत होते. अरबाज आणि शूरा यांच्या लग्नाचे खास फोटोही व्हायरल होताना दिसले. मलायका अरोरा आणि अरबाज खान यांच्या मुलाचे नाव अरहान आहे. विशेष म्हणजे वडिलांच्या लग्नात धमाल करताना अरहान दिसला.

अरहान खान याने अजून बॉलिवूडमध्ये पर्दापण केले नाहीये. मात्र, तो कायमच चर्चेत असतो. अरहान खान हा नुकताच स्पॉट झालाय. विशेष म्हणजे अरहान खान आणि त्याची सावत्र आई शूरा खान यांच्यामध्ये अत्यंत खास नाते बघायला मिळतंय. अरहान खान आणि शूरा खान यांच्यातील खास नाते व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमधून स्पष्ट दिसत आहे. अरहान खान आणि शूरा खान हे बोलत बोलत बाहेर येताना दिसत आहेत.

विशेष म्हणजे अरहान खान आणि शूरा दोघेही हसत आहेत. दोघेही आनंदी दिसत आहेत. यानंतर शूरा खान आणि अरहान एकाच गाडीमध्ये बसून निघताना देखील दिसत आहेत. आता हाच व्हिडीओ लोकांना प्रचंड आवडताना दिसतोय. अरहान आणि त्याची सावत्र आई दोघांमध्ये चांगले नाते असल्याचे सर्वांचे म्हणणे आहे. ही पहिली वेळ नाही की, अरहान खान आणि शूरा एकत्र स्पॉट झाले. यापूर्वीही अनेकदा अरहान खान आणि शूरा एकत्र स्पॉट होतात. काही दिवसांपूर्वीच सावत्र आई शूरा खान, वडील अरबाज खान यांच्यासोबत डिनरला अरहान पोहोचला होता. विशेष म्हणजे यावेळी अरहान हाच गाडी चालवताना दिसला. अरहान खान हा आई मलायका अरोरा हिच्यासोबतही चांगला वेळ घालवताना दिसतो.

 

गेल्या काही दिवसांपासून मलायका अरोरा सतत विदेशात जाताना दिसत आहे. विशेष म्हणजे खास फोटो आणि व्हिडीओ मलायका आपल्या चाहत्यांसाठी शेअर करत आहे. मलायका आणि अर्जुनचे ब्रेकअप झाल्याची चर्चा आहे. मात्र, दोघांनीही यावर भाष्य केले नाहीये. अर्जुन कपूर याच्यानंतर खास व्यक्ती मलायका अरोरा हिच्या आयुष्यात आल्याचेही सांगितले जात आहे.