Aryan Khan Drugs Case | आर्यन खानच्या अडचणीत आणखी वाढ होणार? ड्रग्ज प्रकरणी बँक खात्यांचा तपास केला जाणार!

| Updated on: Oct 23, 2021 | 1:33 PM

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी (Aryan Khan Drugs Case) आता त्याच्या बँक खात्याचा तपास सुरू करण्यात आला आहे. ड्रग्ज घेण्यासाठी त्याने स्वतः पैसे खर्च केलेत का, हे तपासण्याच काम सुरू आहे. एनसीबी अधिकारी स्वतः याचा तपास करत आहेत.

Aryan Khan Drugs Case | आर्यन खानच्या अडचणीत आणखी वाढ होणार? ड्रग्ज प्रकरणी बँक खात्यांचा तपास केला जाणार!
Aryan Khan
Follow us on

मुंबई : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी (Aryan Khan Drugs Case) आता त्याच्या बँक खात्याचा तपास सुरू करण्यात आला आहे. ड्रग्ज घेण्यासाठी त्याने स्वतः पैसे खर्च केलेत का, हे तपासण्याच काम सुरू आहे. एनसीबी अधिकारी स्वतः याचा तपास करत आहेत. मुंबई क्रुझ ड्रग्ज पार्टीप्रकरणी आर्यन खान याला 2 ऑक्टोबर रोजी अटक झाली होती. तेव्हा पासून तो सुरुवातीला एनसीबी कस्टडीत होता, त्यानंतर आता जेलमध्ये आहे.

त्याच्या व्हॉट्सअप संवादात अभिनेत्री अनन्या पांडे हीच नाव उघडकीस आलं आहे. अनन्या पांडे आणि आर्यन खान यांच्यात ड्रग्ज बाबत चर्चा झाली होती. दोघांमध्ये ड्रग्ज मागवण्याबाबत चर्चा झाली होती. याचमुळे एनसीबी अधिकाऱ्यांनी अनन्या पांडे हिला दोन वेळा चौकशीसाठी बोलावलं होतं. तिची सुमारे सात तास चौकशी झाली आहे. यावेळी या संभाषणाबाबत चौकशी झाली. याच संभाषणामुळे आर्यन याला जामीन मिळण्यास अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे एनसीबी अधिकारी आता आर्यन खान, अनन्या पांडे यांच्या ड्रग्ज अँगलने तपास करत आहे

या प्रश्नानावर होणार तपासणी!

आर्यन खान हा ड्रग्स मागवत होता का?

तो स्वतःसाठी मागवायचा का?

तो इतर कोणासाठी ड्रग्स मागवायचा का?

तो स्वतःसाठी आणि आपल्या मित्रांसाठी ड्रग्स मागवत होता का?

शिवाय या ड्रग्ससाठी पैसे कसे दिले जायचे?

कोण पैसे द्यायचे?

कसे पैसे दिले जायचे?

कोणत्या खात्यावरून पैसे दिले जायचे?

एनसीबी अधिकारी आता या अनुषंगाने तपास आता करत आहेत. आर्यन याने ड्रग्जसाठी पैसे दिल्याचं उघडकीस आल्यास त्याच्या अडचणीत वाढ शकते. त्याने ड्रग्जसाठी पैसे दिल्याचं उघडकीस आल्यास त्याच्या विरोधात गंभीर आरोप लागू शकतो आणि त्याला जामीन मिळण्यास अडचण होऊ शकते. याचमुळे आता एनसीबी अधिकारी आर्यन यांच्या बँक खात्याचा तपास करत आहेत.

आर्यन खानला न्यायालयाचा पुन्हा झटका

आर्यन खानसह अरबाज मर्चंट, मुनुमन धामेचा या तिघांचाही जामीन अर्ज मुंबईतील विशेष एनडीपीएस कोर्टाने फेटाळून लावला आहे. आर्यनची अधिक चौकशी करण्यासाठी एनसीबीने त्याची कोठडी मागितली आहे. आर्यनचा संपूर्ण कटात समावेश असल्याता आरोप एनसीबीने केला आहे. त्यामुळे आर्थर रोड तुरुंगातील तिघांचा मुक्काम वाढला आहे. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही व्ही पाटील यांनी या प्रकरणावर सुनावणी घेतली. गेल्या गुरुवारी न्यायालयात तिन्ही आरोपींच्या जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली होती. पण न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला होता. एनडीपीएसच्या विशेष न्यायालयाने आर्यन खानचा जामीन अर्ज पुन्हा एकदा फेटाळला. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही व्ही पाटील यांनी या प्रकरणावर सुनावणी घेतली. आर्यन खानसह अरबाज मर्चंट, मुनुमन धामेचा या तिघांचाही जामीन अर्ज मुंबईतील विशेष एनडीपीएस कोर्टाने फेटाळून लावला आहे.

हेही वाचा :

Drugs Case | आर्यन-अनन्यानंतर प्रसिद्ध सेलिब्रिटीचा नोकर NCBच्या रडारवर, अभिनेत्रीला ड्रग्ज पुरवल्याचा संशय!

Aryan Khan Drugs Case | शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी पुन्हा एकदा आर्यनच्या भेटीला