KL Rahul : लवकरच शुभमंगल सावधान! केएल राहुलच्या लग्नाचा उडणार बार

| Updated on: Apr 20, 2022 | 10:30 AM

बॉलिवूडनंतर आता क्रीडा विश्वातून लग्न सोहळ्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. यातच केएल राहुल आणि सुनील शेट्टीची मुलगी अथिया हिवाळ्यात लग्न करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

KL Rahul : लवकरच शुभमंगल सावधान! केएल राहुलच्या लग्नाचा उडणार बार
लखनौचा कॅप्टन केएल राहुल
Follow us on

मुंबई : बॉलिवडूमध्ये सध्या लग्नाचा सीजन सुरु आहे. त्यातच आता क्रीड विश्वातही लग्नाचा (Marriage) सीजन सुरु होताना दिसत आहे. अलीकडेच अभिनेत्री आलिया भट आणि रणबीर कपूरच्या लग्नाची चांगलीच चर्चा झाली. दिग्गजांच्या आणि नामवंतांच्या उपस्थितीत झालेल्या या लग्नसोहळ्याकडे देशासह जगभराचं लक्ष लागून होतं. अशातच आता अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि केएल राहुल (KL Rahul) संदर्भात एक बातमी समोर आली आहे. हे मागच्या काही दिवसांपासून डेट करत आहेत. आता या चर्चा इतक्यावरच न थांबता त्यांच्या लग्नाकडेही वळल्या आहेत. एक ताज्या रिपोर्टनुसार अथिया आणि राहुल हिवाळ्यात लग्न करणार असल्याची माहिती आहे. त्यासाठी लग्नाची तयारी देखील सुरु असल्याचं कळतंय. त्यामुळे आता पुन्हा एकदा एक ग्रँड लग्न पहायला आपल्याला मिळू शकतं.

अथियाच्या कुटुबाची परवानगी

एका ठिकाणी प्रकाशित झालेल्या माहितीनुसार, अथियाचे आई-वडील दोघेही राहुलला पसंत करतात. जर सर्व काही ठीक राहिले तर हे वर्ष संपण्यापूर्वी त्यांचे लग्न होईल. तिचे वडील सुनील शेट्टी मुल्की येथील तुळू भाषिक कुटुंबातून जन्मलेले मंगळुरु आहेत. राहुल देखील मंगळुरुचा आहे. त्यामुळे दक्षिण भारतीय सोहळा असण्याची शक्यता आहे.

वाढदिवसाची पोस्ट चर्चेत

अथिया ही अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी आहे. तीन तिचा बॉयफ्रेंड KLराहुलच्या वाढदिवसाला सोशल मिडीयावर खास फोटो पोस्ट केला होता. या फोटो सोबत असणाऱ्या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधलं होतं. या फोटोवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला होता.उथिया शेट्टीने सोशल मीडियावर KL राहूल सोबत तीन फोटो शेअर केले होते. ज्यामध्ये ते एकमेकांवर प्रेमात दिसत होते. पहिल्या फोटोमध्ये अथिया शेट्टी KL राहुलला मिठी मारत होता. तर दुसऱ्या चित्रात अथिया शेट्टी आणि राहुल एकमेकांचा हात धरून चालताना दिसत आहेत. तर तिसऱ्या फोटोत दोघेही विमानात बसून सेल्फी घेताना दिसत आहेत.

इंग्लंडमध्ये एकत्र दिसले

अथिया आणि केएल राहुल बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. जुलैमध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या कसोटी मालिकेदरम्यान अथिया केएल राहुलसोबतही दिसली होती. बीसीसीआयला सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये केएल राहुलने अथियाला आपला जोडीदार असल्याचे म्हटले होते. त्याचवेळी सुनील शेट्टी यांना दोघांच्या नात्याबाबत विचारण्यात आले. तेव्हा, त्यांनी उत्तर तर दिले नाहीच पण नकारही दिला नाव्हता. आणि आता केएल राहुल आणि अथियाचे नाते उघडल्यानंतर, सुनीलने मुलीच्या नात्याला आक्षेप घेतला नाही, फक्त योग्य वेळेची वाट पाहत आहेत.

इतर बातम्या

Surya Grahan 2022 | या दिवशी होणार वर्षातील पहिले सूर्यग्रहण, गरोदर महिलांसाठी महत्त्वाची माहिती

ST workers’ agitation : चाकारमान्यांची उन्हाळी सुटी जोरात, 22 एप्रिलपासून एसटी पुन्हा धावणार; 70 हजार कर्मचारी कामावर हजर

Kajal Aggarwal: ‘सिंघम’ फेम काजल अगरवाल झाली आई; घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन