मुंबई | 06 फेब्रुवारी 2024 : बॉलिवूडमधील दोन सुपरस्टारना लिगल नोटीस आली आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता हृतिक रोशनला लिगल नोटीस देण्यात आली आहे. दीपिका पादुकोण आणि हृतिक रोशन यांचा फायटर हा सिनेमा नुकतंच प्रदर्शित झाला. या सिनेमातील काही सिन्सवर आक्षेप घेण्यात आला आहे. या सिनेमात हृतिक आणि दीपिकाचा एक किसिंग सीन आहे. या सीन करताना या दोघांनी एअर फोर्सचा युनिफॉर्म घातलेला आहे. युनिफॉर्म घालून हा किसिंग सिन केल्याने इंडियन एअर फोर्सचा अवमान झाल्याचं म्हणत या दोघांना लिगल नोटीस देण्यात आली आहे.
फायटर सिनेमातील किसिंग सीनवर आक्षेप घेण्यात आला आहे. इंडियन एअर फोर्सचे विंग कमांडर सौम्यदीप दास यांनी या सीनवर आक्षेप घेतला आहे. या प्रकरणी फायटर सिनेमातील कलाकार आणि दिग्दर्शकांना नोटीस पाठवण्यात आली आहे. इंडियन एअर फोर्सचा युनिफॉर्म घालून असे सिन देणं हा इंडियन एअर फोर्सचा अपमान आहे, असं विंग कमांडर सौम्यदीप दास यांनी म्हटलं आहे.
इंडियन एअर फोर्सचा युनिफॉर्म म्हणजे केवळ एखाद्या कापडाचा तुकडा नाही. चक देशाच्या रक्षणासाठी केलेला त्याग, अनुशासन आणि अतुट समर्पणाचं प्रतिक आहे. या सिनेमात दीपिका आणि हृतिक यांना एअर फोर्सच्या कमांडरच्या सदस्यांच्या रुपात दाखवलं आहे. त्यामुळे युनिफॉर्म घालून असा सिन करणं योग्य नाही, असं सौम्यदीप दास यांचं म्हणणं आहे.
फायटर सिनेमाला आलेल्या लिगल नोटीसमध्ये या किसिंग सीनवर आक्षेप घेण्यात आला आहे. देशाच्या या पवित्र प्रतीकाचा वापर सिनेमातील रोमॅन्टिक अँगलसाठी करणं योग्य नाही. हा आपल्या देशाची सेवा करणाऱ्या असंख्य जवानांच्या बलिदानाचा अपमान आहे. एअर फोर्सच्या युनिफॉर्मवर असं काही करण्याला हा सीन सामान्य करतो. आपल्या देशाच्या सिमांचं संरक्षण करणाऱ्यांवर सोपलेल्या जबाबदारीविरोधात हा सिन चुकीचा मेसेज पोहोतचवतो, असं या नोटीमध्ये म्हणण्यात आलं आहे.