नवी दिल्ली : अभिनेत्री सोनम कपूर (sonam kapoor) आणि तिचा पती आनंद अहुजा (anand ahuja) यांच्या घरात चोरी झाली आहे. यात 1.4 कोटींची रोख रक्कम आणि दागिने घेऊन चोर लंपास झालेत. दिल्लीतील अमृता शेरगिल रोडवर आनंद अहुजा यांचे वडील हरीश अहुजा (Harish Ahuja) आणि आई प्रिया अहुजा (Priya Ahuja) राहतात. त्यांच्या घरात चोरी झाली आहे. आनंद अहुजा यांचे वडील म्हणजेच सोनम कपूरचे सासरे हरीश अहुजा आणि आई प्रिया अहुजा राहतात. तसंच इथे सोनमची आजेसासू सरला आहुजा (Sarala Ahuja) देखील राहतात. त्याच्या घरात चौरी झाली आहे. सरला आहुजा यांनी घरातील मॅनेजर रितेश गौरासोबत 23 फेब्रुवारी रोजी तुघलक रोड पोलीस स्टेशनला गेल्या. घरातील कपाटामधून दागिने आणि रोक रक्कम गायब झाल्याची त्यांनी तक्रार दाखल केली.
सोनम कपूर आणि तिचा पती आनंद अहुजा यांच्या घरात चोरी झाली आहे. यात 1.4 कोटींची रोख रक्कम आणि दागिने घेऊन चोर लंपास झालेत. दिल्लीतील अमृता शेरगिल रोडवर आनंद अहुजा यांचे वडील हरीश अहुजा आणि आई प्रिया अहुजा राहतात. त्यांच्या घरात चोरी झाली आहे. आनंद अहुजा यांचे वडील म्हणजेच सोनम कपूरचे सासरे हरीश अहुजा आणि आई प्रिया अहुजा राहतात. तसंच इथे सोनमची आजेसासू सरला आहुजा देखील राहतात. त्याच्या घरात चौरी झाली आहे. सरला आहुजा यांनी घरातील मॅनेजर रितेश गौरासोबत 23 फेब्रुवारी रोजी तुघलक रोड पोलीस स्टेशनला गेल्या. घरातील कपाटामधून दागिने आणि रोक रक्कम गायब झाल्याची त्यांनी तक्रार दाखल केली. 11 फेब्रुवारी या दिवशी कपाटात पाहिलं असता, पैसे आणि काही दागिने गायब असल्याचं लक्षात आलं, दोन वर्षापूर्वी आम्ही दागिने व्यवस्थित पॅक करून ठेवले होते, असं सरला आहुजा यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. अशी माहिती नवी दिल्लीतील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.
सोनम कपूर लवकरच आई होणार आहे. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत तिने काही दिवसांआधी चाहत्यांना गुड न्यूज दिली. सोनमने इन्स्टाग्रामवर पती आनंद अहुजासोबतचे हे फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये तिचा बेबी बंप पहायला मिळतोय. सोनमच्या या पोस्टवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव झाला. करीना कपूर, दिया मिर्झा, अनन्या पांडे, जॅकलिन फर्नांडिस यांसारख्या सेलिब्रिटींनी कमेंट्स करत सोनमला शुभेच्छा दिल्या.
संबंधित बातम्या