मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याच्यासाठी 2023 हे वर्षे अत्यंत खास ठरले. विशेष म्हणजे शाहरुख खानचे तिन्ही चित्रपट सुपरहिट ठरले. शाहरुख खान हा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चित्रपटांचे प्रमोशन करतानाही दिसला. शाहरुख खान याचा पठाण चित्रपट रिलीज झाला आणि एकच धमाका बघायला मिळाला. या चित्रपटाने रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. शाहरुख खान डंकी चित्रपटाला प्रेक्षकांनी प्रेम दिले. चित्रपट रिलीज होण्याअगोदर चाहत्यांसाठी खास सेशनचे आयोजन हे शाहरुख खान याच्याकडून केले जात होते. या सेशनमध्ये शाहरुख खान आपल्या चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना दिसत होता.
शाहरुख खान हा चित्रपटाच्या शूटिंगमधून वेळ काढून कुटुंबासोबत धमाल करताना कायमच दिसतो. सध्या सोशल मीडियावर शाहरुख खान याचे काही खास फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे या फोटोमध्ये शाहरुख खान याच्यासोबत त्याची लाडकी लेक सुहाना खान ही देखील दिसत आहे. सुहाना आणि शाहरुख खान हे न्यूयॉर्कमध्ये शॉपिंग करताना दिसत आहेत.
शाहरुख खान आणि सुहाना शूज घेण्यासाठी पोहोचल्याचे दिसत आहे. एका फोटोमध्ये शाहरुख खान हा शूज बघताना दिसतोय. दुसऱ्या फोटोमध्ये शाहरुख खानच्या बाजूला सुहाना ही दिसत आहे आणि ती वडिलांना काहीतरी बोलत आहे. तिसऱ्या फोटोमध्ये शाहरुख खानच्या भोवती चाहते दिसत आहेत. आता हेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
एकाने या फोटोवर कमेंट करत म्हटले की, शाहरुख खान हा इतक्या मोठ्या संपत्तीचा मालक आहे आणि किती साध्यापणाने शॉपिंग करतोय. शाहरुख खान याची लेक सुहाना खान हिने बॉलिवूडमध्ये पर्दापण केले आहे. मात्र, सुहाना खान हिच्या चित्रपटाला म्हणावा तसा धमाका करण्यात अजिबातच यश मिळाले नाहीये. सोशल मीडियावरही सुहाना सक्रिय दिसत आहे.