मुंबई : बॉलिवूडचा स्टार अभिनेता शाहरुख खानने त्याच्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. त्यानं बॉलिवूडमध्ये एक से बढकर एक चित्रपट देत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज शाहरुख खानचा चाहता वर्ग लाखांहून अधिक आहे. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते नेहमीच आतुर असतात. तसंच आता शाहरुख खानचा त्याच्या एका चाहतीसोबतचा एक किसींग व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नुकताच शाहरुख खान दुबईला त्याच्या एका मित्राच्या रिअल इस्टेट ब्रँडच्या जाहिरातीसाठी गेला होता. या कार्यक्रमानंतर तो तेथे उपस्थित असलेल्या काही पाहुण्यांसह त्याच्या चाहत्यांना भेटला. यावेळी शाहरुखला त्याची एक चाहती किस करताना दिसत आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये शाहरुख खान काळ्या रंगाच्या सूटमध्ये दिसत आहे. त्याच्यासोबत त्याची व्यवस्थापक पूजा ददलानी देखील दिसत आहे. त्यावेळी अचानक एक चाहता शाहरुखच्या हाताचे चुंबन घेतो आणि त्याला मिठी मारतो. त्यानंतर मागून एक महिला चाहती येते आणि ती थेट शाहरुखच्या गालावर किस करते. किस केल्यानंतर चाहती चांगलीच खूश होते. विशेष म्हणजे चाहतीनं किस करण्यापूर्वी शाहरुखला विचारलं की मी तुला किस करू शकते का त्यावेळी शाहरुख काही बोलण्यापूर्वीच ती त्याला किस करते. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. तसंच या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्स देखील केल्या आहेत.
सोशल मीडियावर काही नेटकऱ्यांना या चाहतीचं हे कृत्य आवडलेलं नाहीये. यावेळी एका युजरनं म्हटलं आहे की, तिला तुरूंगात टाका. तर दुसऱ्यानं म्हटलं की, एखाद्या चाहत्यानं हेच कृत्य माधुरी किंवा करीनासोबत केलं असतं तर तो वाचला असता का?