मुंबई : सध्या सोशल मीडियावर अनेक मोठ्या बॉलिवूड स्टार्सचे लहानपणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण बर्याचदा नेटकऱ्यांना ते स्टार्स कोण आहेत हे ओळखता येत नाही. आताही एका बॉलिवूड स्टारकिडचा लहानपणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांच्या मांडीवर बसलेला दिसत आहे.
जया बच्चन यांच्यासोबत असलेल्या या स्टारकिडचा फोटो ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटातील आहे. या चित्रपटात या स्टारकिडचा रोल छोटाच होता पण त्याच्या क्यूटनेसमुळे त्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. या चित्रपटात त्यानं लहानपणीच्या शाहरुख खानची भूमिका साकारली होती. तर तुम्ही या क्यूट स्टारकिडला ओळखू शकता का? चला तर मग आपण त्याच्याबाबत जाणून घेऊया.
करण जौहरचा कभी खुशी कभी गम या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली होती. तर आता याच चित्रपटातील जया बच्चन आणि त्यांच्या मांडीवर बसलेल्या स्टारकिडचा फोटो चर्चेत आहे. विशेष सांगायचं झालं तर फोटोतील या स्टारकिडचं शाहरुख खानशी विशेष नातं आहे.
जर तुम्ही या स्टारकिडला ओळखलं नसेल तर हा स्टारकिड दुसरा तिसरा कोणी नसून शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यन खान आहे. आर्यन खानने या चित्रपटात शाहरुख खानच्या लहानपणीची भूमिका साकारली होती. तसंच आता आर्यन खान मोठा झाला असून सध्या तो लूकच्या बाबतीत सेम शाहरुखसारखाच दिसतोय.
आर्यन खान मागे ड्रग्ज प्रकरणात सापडल्याने चर्चेत आला होता. या प्रकरणामध्ये त्याला जेलमध्येही जावं लागलं होतं. मात्र काही दिवसांनंतर कोर्टाडून त्याची निर्दोष मुक्तता झाली. यामधील अधिकारी समीर वानखेडे यांनी केलेल्या कारवाईवरून त्यांच्यावरच अनेकांनी टीका केली होती.