मुंबई : बॉलिवूडचा खेळाडू म्हणजेच अक्षय कुमार (Akshay Kumar) आज 54 वर्षांचा झाला आहे. अक्षय कुमारचा जन्म 1967 मध्ये याच दिवशी म्हणजेच 9 सप्टेंबर रोजी झाला. अक्षय कुमार अॅक्शनच्या बाबतीत बॉलिवूडच्या टॉप स्टार्सपैकी एक आहे, तर त्याच्या कॉमेडीबद्दल काय बोलावे! अक्षयने ‘हेरा फेरी’, ‘मुझसे शादी करोगी’, ‘गरम मसाला’, ‘भागम भाग’, ‘भूल भुलैया’ सारख्या अनेक उत्तम विनोदी चित्रपटांद्वारे प्रेक्षकांमध्ये स्वतःसाठी एक स्थान निर्माण केले आहे.
अक्षय कुमार 1991मध्ये ‘सौगंध’ चित्रपटाने बॉलिवूड करिअरची सुरुवात केली होती. 1990पर्यंत अक्षय कुमारने हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःला ‘खिलाडी’ म्हणून स्थापित केले होते. अनेक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या अक्षय कुमारच्या चित्रपटांची प्रेक्षक नेहमीच मनापासून वाट पाहत असतात.
अभिनयाच्या वेडापायी अक्षय कुमारने दिल्ली ते मुंबई असा प्रवास केला आहे आणि आज अक्षय कुमारचे नाव इंडस्ट्रीच्या अशा काही स्टार्समध्ये समाविष्ट आहे, ज्यांनी प्रचंड यश मिळवले आहे. सामान्य जीवनापासून, मोठा स्टार बनण्यापर्यंतचा प्रवास त्याने लोकांसमोर अनेक वेळा कथन केला आहे. चला तर, त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्याच्या आयुष्याशी संबंधित काही खास गोष्टी…
अभिनेता अक्षय कुमारचा जन्म 1967 मध्ये अमृतसर येथे एका सैनिकी पार्श्वभूमी असणाऱ्या कुटुंबात झाला. त्याचे वडील हरी ओम भाटिया हे सैन्यात अधिकारी होते. अक्षय कुमारचे खरे नाव राजीव हरी ओम भाटिया आहे. त्याला लहानपणापासूनच अभिनेता बनण्याची आवड होती, त्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली होती. असे म्हटले जाते की, लहानपणी एकदा अक्षय कुमारला त्याच्या वडिलांनी विचारले होते, तुला काय व्हायचे आहे? यावर अक्षयने लगेचच उत्तर दिले होते अभिनेता.
लहानपणी अक्षय जुन्या दिल्लीच्या चांदणी चौक परिसरात राहत होता. त्यानंतर तो मुंबईला आला, जिथे त्याने खालसा कॉलेजमध्ये पुढील शिक्षण घेण्यास सुरूवात केली, पण मध्येच त्याचा अभ्यास सोडून तो मार्शल आर्टचे प्रशिक्षण घेण्यासाठी बँकॉकला गेला. तेथे त्याने आपला खर्च भागवण्यासाठी वेटर म्हणूनही काम केले. बँकॉकमधील एका मित्राच्या मॉडेलिंग करण्याच्या सल्ल्यानंतर त्याने प्रयत्न सुरू केले आणि 1990च्या दशकात चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.
अक्षय कुमार एकूण 1870 कोटी रुपयांच्या मालमत्तेचा मालक आहे. अक्षय कुमारची बहुतेक कमाई ब्रँड प्रमोशनमधून होते. अक्षय कुमार गत वर्षी फोर्ब्सच्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत सामील झाल्याची माहिती देखील आहे. अक्षय कुमार हा एकमेव भारतीय आहे, ज्याचे नाव या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. या यादीनुसार, अक्षय हा बॉलिवूडचा हाय पेड स्टार आहे. अक्षय कुमार एका चित्रपटासाठी 45 कोटी रुपयांपेक्षा जास्त फी घेतो. त्याचबरोबर अक्षय कुमार एका ब्रँडच्या जाहिरातीसाठी सुमारे 6 ते 7 कोटी रुपये मानधन घेतो.
आईच्या अतिशय जवळ होता अभिनेता अक्षय कुमार, पाहा माय-लेकाचे काही खास फोटो…
Akshay Kumar Mother Death | अक्षय कुमारला मातृशोक, उपचारादरम्यान अरुणा भाटियांचे निधन