मुंबई : 18 सप्टेंबर 1950 रोजी जन्मलेली अभिनेत्री शबाना आझमी (Shabana Azmi) आपला 71वा वाढदिवस साजरा करत आहे. शबाना या प्रसिद्ध कवी कैफी आझमी यांची मुलगी आहे. त्यांचा भाऊ बाबा आझमी एक सिनेमॅटोग्राफर आहेत. शबाना आझमी यांचे बालपण कलात्मक वातावरणात गेले. वडील प्रसिद्ध कवी कैफी आझमी आणि आई थिएटर अभिनेत्री शौकत आझमी यांच्या संगोपनात शबाना यांचे बालपण अतिशय आनंदात गेले.
आईकडून मिळालेल्या अभिनय प्रतिभेला सकारात्मक वळण देऊन शबाना यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत आपला प्रवास सुरू केला. पारंपारिक मुस्लिम कुटुंबातील असूनही, शबाना यांनी चित्रपट जगतात पाऊल टाकले आणि प्रत्येक पात्रात स्वतःला उत्कृष्ट सिद्ध केले.
शबाना आझमी यांच्या जीवनाबद्दल अशा अनेक कथा आहेत, ज्याबद्दल बहुतेक लोकांना माहिती नसेल. त्यांच्या आई शौकत आझमी यांच्या आत्मचरित्र ‘कैफी अँड आय मेमॉयर’मध्ये अनेक गोष्टी उघड केल्या आहेत. शौकत आझमी यांचे 22 नोव्हेंबर 2019 रोजी निधन झाले. त्यांनी 2005मध्ये हे आत्मचरित्र लिहिले. शबाना यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या आयुष्यातील काही रंजक गोष्टींवर एक नजर टाकूया…
शौकत यांनी आत्मचरित्र एक किस्सा लिहिला आहे. त्यात त्या म्हणतात की, ‘शबानाला वाटायचे की, मी बाबावर (शबानाचा धाकटा भाऊ) तिच्यापेक्षा जास्त प्रेम करते. एकदा सकाळी मी शबाना (9) आणि बाबाला (6) नाश्ता देत होते. मी शबानाच्या प्लेटमधून एक टोस्ट घेतला आणि बाबाला दिला. या वेळी शबानाला म्हणाके की, बाबाची बस लवकरच येईल, म्हणून मी तुझा टोस्ट त्याला देत आहे. तुझ्याकडे अजून बराच वेळ आहे. मी अॅलिसला (नोकर) दुसरा टोस्ट आणायला पाठवले आणि त्यावेळी शबानाने शांतपणे नाश्त्याचे टेबल सोडले. जेव्हा अॅलिस परत आली, तेव्हा मी शबानाला आवाज दिला आणि म्हणले, तुझा टोस्ट तयार आहे. मात्र, त्यावेळी मी तिला बाथरूममधून रडताना ऐकले आणि तिथे धावत गेले. तिने मला पाहिले आणि घाईघाईने अश्रू पुसत शाळेत गेली.’
शौकत यांनी पुढे लिहिले की, ‘यानंतर शबाना शाळेच्या प्रयोगशाळेत गेली आणि तिने तिथे कॉपर सल्फेट खाल्ले. तिची सर्वात चांगली मैत्रीण पर्णा मला म्हणाली की, शबाना तिला म्हणाली की, मी तिच्यापेक्षा बाबावर जास्त प्रेम करते. हे ऐकून मी निराशेने कपाळावर हात टेकले.’
शबानाने लहानपणी आणखी एकदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. शौकत यांनी पुस्तकात लिहिले, ‘मला आणखी एक घटना आठवते, जेव्हा मी तिला तिच्या असभ्य वर्तनामुळे घर सोडण्यास सांगितले होते. त्यानंतर मला समजले की, ग्रँट रोड रेल्वे स्टेशनवर तिने ट्रेनसमोर उडी मारण्याचा प्रयत्न केला होता. सुदैवाने तिच्या शाळेचा शिपाई तिथे हजार होता. ‘बेबी … बेबी तू काय करतेस’ असे म्हणत त्याने तिला ओढले. शबाना दुसऱ्यांदाही वाचली, पण मी मात्र अस्वस्थ झाले.’
शौकत यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे की, शबाना लहानपणापासून तत्त्वनिष्ठ होत्या. शौकत यांच्या म्हणण्यानुसार, त्या शबानाला जुहू ते सांताक्रूझ स्टेशनसाठी दिवसाला 30 पैसे द्यायच्या. तिला काही खाऊ हवा असल्यास ती पाच पैसे वाचवण्यासाठी जुहू चौपाटीवर उतरायची. पण कधीही त्यांनी त्यांच्या पालकांकडे जास्तीचे पैसे मागितले. कधीही अतिरिक्त पैशांची मागणी केली नाही. फक्त शबानाची सर्वात चांगली मैत्रीण पर्णा हिने त्यांना याबद्दल सांगितले होते.
शबाना नेहमी कुटुंबाला मदत करण्यासाठी पैसे कमवण्याचा विचार करायच्या. सिनिअर केंब्रिजमध्ये प्रथम श्रेणी उत्तीर्ण झाल्यानंतर, महाविद्यालयात प्रवेश घेण्यापूर्वी शबाना यांनी पेट्रोल पंपवर तीन महिने ब्रू कॉफी विकली. तिला त्यातून दररोज 30 रुपये मिळत असत. तिने याबद्दल घरी कधीही सांगितले नाही. एक दिवस त्यांनी हे सर्व पैसे आईकडे दिले, तव्हा त्यांनी याबद्दल विचारले. तेव्हा शबाना यांनी तीन महिने कसे सत्कारणी लावले ते सांगितले.
शबाना आझमी यांनी एका मुलाखतीत कबूल केले होते की, त्या ‘बँडिट क्वीन’ सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक शेखर कपूर यांच्यासोबत अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होत्या. त्यांचे ब्रेकअप देखील परस्पर संमतीने झाले होते. शबाना यांनी असेही म्हटले होते की, जेव्हा त्यांचे ब्रेकअप झाले, तेव्हा तिने शेखरसोबत एक चित्रपट केला होता. त्याचे दिग्दर्शक शेखर होते आणि त्यांची पत्नी मेधा त्यांना मदत करत होती.
2004 मध्ये एका मुलाखतीदरम्यान, शबाना यांनी कबूल केले होते की, त्यांचा शशी कपूरवर क्रश होता. शबाना म्हणाल्या की, ‘शशी आणि त्याची पत्नी जेनिफर आमचे कौटुंबिक मित्र होते. पृथ्वीराज कपूर माझ्या आईवडिलांच्या शेजारी राहायचे आणि दर रविवारी जेव्हा शशी पापाला भेटायला यायचे, तेव्हा मी त्यांच्या सहीसाठी एक फोटो विकत घ्यायचे.
2004मध्ये एका मुलाखती दरम्यान, शबाना म्हणाल्या होत्या की, ‘जावेद अनेकदा अब्बाकडे कविता घेऊन यायचे आणि त्यांचा सल्ला घ्यायचे. जेव्हा मी त्याला ओळखू लागले, तेव्हा तो काहीसा मजेदार, सुजाण आणि काहीसा अब्बासारखा होता. हेच कारण होते की, मी त्याच्याकडे आकर्षित झाले. जावेदचे आधी लग्न झाले होते. म्हणून आम्ही अनेक वेळा ब्रेकअप करण्याचा प्रयत्न केला. नंतर त्याने त्याच्या पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला आणि 9 डिसेंबर 1984 रोजी आम्ही लग्न केले.’
जावेद अख्तरचे पहिले लग्न हनी इराणीसोबत झाले होते. दोघांना दोन मुले आहेत. जावेद आणि हनी यांचे मार्च 1972 मध्ये लग्न झाले आणि 7 महिन्यांनंतर ऑक्टोबर 1972 मध्ये ते मुलगी झोयाचे पालक झाले. त्यांचा मुलगा फरहान अख्तरचा जन्म 1974 मध्ये झाला. विशेष म्हणजे शबाना आणि जावेद यांना मुलं नाहीत.