ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांना बॉलिवूडचे प्रख्यात स्टार कपल आहे. परंतू या दोघांच्या नात्यात मोठी दरी निर्माण झाल्याच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे हे दोघेही कायम चर्चेत आहेत. या दोघांच्या घटस्फोटाच्या बातम्या किती खऱ्या आणि किती खोट्या हे तर येणारा काळच सांगेल. आज आपण या दोघांच्या कारचे कलेक्शन पाहणार आहोत. यांच्या कार कलेक्शनमध्ये अनेक क्लासी कारचा समावेश आहे. त्यांची किंमत करोडो रुपयात आहे. या कारमध्ये एकसौ एक एडव्हान्स फिचर्सचा समावेश आहे.
बच्चन कुटुंबाकडे असलेल्या लक्झरीयस कार कलेक्शनमध्ये सर्वात वरती रोल्स रॉयस फॅंटम आहे. या कारची किंमत तुम्हाला हैराण करुन टाकेल. या कारची किंमत ९.५० कोटी रुपये आहे. फॅंटममध्ये ६.८ लिटरचे V १२ इंजिन आहे. जे ५६३ बीएचपी आणि ९०० टॉर्क जनरेट करते. या कारचा इंटेरिअर खूपच क्लासी आहे. यात आरामासाठी अनेक चांगल्या सुविधा आहे. तसेच आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे.
मर्सिडीज-बेंझ एक्स- क्लास खूप काळ लक्झरी सेडान कारमध्ये सर्वाधिक प्रसिद्ध कार आहे. परंतू ती आता भारतातून खरेदी करता येत नाही. या कारची एक्स-शोरुम किंमत १.७६ कोटी रुपये होती. आपल्या एडव्हान्स फिचर्स आणि परफॉर्मेंसमुळे ती चांगला ड्रायव्हींग एक्सिरिन्स देते.
बेंटले लांबच्या प्रवासासाठी चांगला पर्याय आहे. या टु सिटर लक्झरीय कारची किंमत ३.२९ कोटी रुपये होती. या कारला पॉवरफूल सहा लिटर V१२ इंजिन आहे.जे ६२६ बीएचपी आणि ८२० एनएमचे टॉर्क जनरेट करते. या शिवाय बच्चन फॅमिली जवळ मर्सिडीज बेंझ जीएल ६३ एएमजी कार देखील आहे.
बच्चन कुटुंबियांकडे पोर्श केमॅन देखील आहे. ही कार चांगल्या ड्रायव्हींग डायनामिक्ससाठी पसंद केली जाते. सध्या पोर्श केमॅनची किंमत १.४७ कोटी रुपयांपासून सुरु होते. पोर्श केमॅन मध्ये २.० लिटरचे इंजिन आहे. जे २९५ बीएचपी आणि ३८० एनएमचे टॉर्क जनरेट करते.