मुंबई : सोशल मीडियावर रोज नवे ट्रेण्ड येतात. सिनेकलाकार चर्चेत राहण्यासाठी रोज आपले फोटो सोशल मीडियावर अपलोड करत असतात. छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका FIR मधील पोलीस चंद्रमुखी चौटाला म्हणजेच कविता कौशिकही (Kavita Kaushik) सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. ती ट्विटर, इन्स्टाग्रामसारख्या माध्यमांवर आपले फोटो, व्हिडीओ अपलोड करत असते. तिने नुकताच शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती तिच्या पतीसोबत म्हणजेच रोनित बिस्वाससोबत (Ronit Biswas) असून यामध्ये ती चक्क पडली असल्याचं दिसत आहे. (Kavita Kaushik yoga failure video getting viral on internate )
No one is posting their failures online, what we see is picture perfect shots, but life is about correction , falling and getting up to fix one’s self. This is what happens when it’s too many paranthas for breakfast ? pic.twitter.com/maWM4IELB5
— Kavita Kaushik (@Iamkavitak) February 19, 2021
या व्हिडीओमध्ये ती आपल्या पतीसोबत योगा करताना दिसत आहे. तिचा पती जमिनीवर बसला असून ती त्याच्या खांद्यावर उभं राहण्याचा प्रयत्न करतेय. मात्र, रोनित बिस्वासच्या खांद्यावर उभं राहण्याचा प्रयत्न करत असताना ती थेट जमिनीवर कोसळते. तसेच, जमिनीवर कोसळल्यानंतर कविता आणि तिच्या पतीमध्ये हशा पिकलेला आपल्याला या व्हिडीओमध्ये दिसतो. या व्हिडीओसोबत दिलेले कॅप्शनसुद्धा अगदीच मार्मिक आहे. ”या जगात कोणीही आपले अपयश सोशल मीडियावर पोस्ट करत नाही. आभासी जगात आपण जे पाहतो, ते परफेक्ट फोटो असतात. त्यामध्ये कोणतीही चूक नसते. मात्र, हे आयुष्य यश आणि अपयशाने भरलेलं आहे. यामधून आपण शिकत जातो. पण या व्हिडीमध्ये मी जी पडली आहे, ते अपयश फक्त सकाळी भरपूर पराठे खाल्ल्यामुळे येते,” असे तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.
दरम्यान, कविता कौशिकच्या या व्हिडीओला सोशल मीडियावर खूप पसंती मिळते आहे. तिच्या चाहत्यांकडून या व्हिडीओला अनके लाईक्स मिळत असून या व्हिडीओवर भरपूर कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
इतर बातम्या :
(Kavita Kaushik yoga failure video getting viral on internate)