‘पठाण’ चित्रपटाच्या यशानंतर राज ठाकरेंकडून शाहरूख, दीपिकाचं कौतुक

| Updated on: Feb 09, 2023 | 8:36 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही चित्रपटातील स्टार कास्टचं कौतुक आहे. राज ठाकरे यांनी चित्रपटामधील प्रमुख भूमिकेत असलेला अभिनेता शाहरूख खान आणि अभिनेत्री दीपिका पदुकोन यांचं अभिनंदन केलं आहे.

पठाण चित्रपटाच्या यशानंतर राज ठाकरेंकडून शाहरूख, दीपिकाचं कौतुक
Follow us on

मुंबई : पठाण चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सध्या धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने एका आठवड्याच्या आतच जवळपास 100 कोटींच्या वर गल्ला जमवला आहे. बॉलिवूड किंग शाहरूख खानने तब्बल चार वर्षांनी पदार्पण केलं होतं. चित्रपट प्रदर्षित होण्याच्या आधी मोठा विरोध झाला होता मात्र चित्रपट पडद्यावर आल्यावर मोठ्या प्रमाणात कमाई करताना दिसत आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही चित्रपटातील स्टार कास्टचं कौतुक आहे. राज ठाकरे यांनी चित्रपटामधील प्रमुख भूमिकेत असलेला अभिनेता शाहरूख खान आणि अभिनेत्री दीपिका पदुकोन यांचं अभिनंदन केलं आहे.

राज ठाकरे यांनी शाहरूख आणि दीपिकाला बुके पाठवल्याची माहिती समजत आहे. राज ठाकरे यांच्या कृतीची चर्चा होताना दिसत आहे. कारण एकीकडे हिंदुत्त्ववादी संघटनांनी या चित्रपटाला प्रदर्षित होण्याआधी विरोध केला होता. आता राज ठाकरे यांनीच चित्रपटातील अभिनेता आणि अभिनेत्रीचं अभिनंदन केल्याने विविध चर्चांणा उधाण आलं आहे.

हिंदी भाषेमध्ये पठाण चित्रपटाला धमाका करण्यात यश मिळाले. मात्र, साऊथमध्ये शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाची हवा झाली नाही. पंधरा दिवसांमध्ये पठाण चित्रपटाने एकूण साऊथमध्ये 16.20 कोटींचे बाॅक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. तमिळ आणि तेलुगू भाषांमध्येही पठाण चित्रपट रिलीज झाला.

दरम्यान, बजरंग दल पठाण चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. इतकेच नाही तर पुण्यात बजरंग दलाने पठाण चित्रपटाचे पोस्टर देखील काढले होते. तर मुंबईमध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी थिएटर मालकांना नोटीस पाठवल्या होत्या.

कशावरून झाला होता चित्रपटाला विरोध
चित्रपटामधील ‘बेशरम रंग’ गाण्यामध्ये दीपिका पदुकोनने परिधान केलेल्या बिकिनीच्या रंगावरून वाद निर्माण झाला होता. भगव्या रंगाच्या बिकिनीमुळे हिंदु धर्मियांच्या भावना दुखावल्या होत्या. बेशरम रंग हे गाणं सर्वांच्या पसंतीस उतरलं होतं, त्यावेळी सेन्सॉर कमिटीने गाण्यात बदल करुन रिलीज करण्याचा आदेश दिला होता.