मुंबई : ‘झुंड‘ (Jhund) हा सिनेमा सर्वत्र धुमाकुळ घालतोय. या सिनेमाना लोकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलंय. अनेक ठिकाणी शो हाऊसफुल्ल झालेत. सर्वत्र नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचे वेगळ्या धाटणीचा सिनेमा केल्याबद्दल कौतुक होतंय. तसंच नॉन अॅक्टर लोकांनी केलेल्या कामाचं विशेष कौतुक होतंय. अश्यात आता एका गावात तर चक्क अख्खं थिएटर बुक करण्यात आलंय. तसंच इंडिया आणि भारतातील भिंत तोडल्याबद्दल नागराज मंजुळे यांचे आभार मानण्यात आलेत. आख्खं थिएटर बुक करण्यामागचं या मागचं कारणही विशेष आहे. झुंडमधील कलाकार प्रवीण डाळिंबकर यांच्या भीमनगर, भावसिंगपुरा (Bhimnagar Bhavsinghpra) गावात आख्खं थिएटर बुक करण्यात आलं आहे.
भीमनगर मोहल्ला नाटकात पडद्यामागे महत्वाची भूमिका बजावणारे कलाकार आनंद मोघे यांचं पाच वर्षांआधी आजच्याच दिवशी निधन झालं. याच अपघातात प्रवीण डाळिंबकर यांनाही दुखापत झाली होती. प्रवीण यांनी झुंडमध्ये काम केलं आहे. त्यांचा सत्कार करण्यासाठी आणि आनंद मोघे यांच्या आठवणी जागवण्यासाठी उद्या प्रवीण यांच्या भीमनगर, भावसिंगपुरा या गावात महिलांसाठी झुंड दाखण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे. यासाठी भीमनगरच्या अंबा-अप्सरा हे अख्खं थिएटर बुक करण्यात आलं आहे.
कोण आहे प्रवीण डाळिंबकर?
‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ नाटकात प्रवीण डाळिंबकर यांनी काम केलं आहे. शिवाय ‘चला, हवा येऊ द्या’ या झी मराठीवरील कार्यक्रमातही प्रवीण डाळिंबकर दिसलेत. तसंच झुंड या सिनेमातही त्यांची महत्वपूर्ण भूमिका आहे. झी मराठीवरील माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत त्यांनी रघू ही भूमिका साकारली होती.
आख्खं थिएटर बुक
“आज बरोबर पाच वर्षे झाली, शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला नाटकाचा प्रयोग करून सामानाचा टेम्पो मुंबई कडे येत असताना माजलगाव येथे चाळीस फूट खोल कालव्यात पडून मोठा अपघात झाला होता. यात आपला आनंद मोघे (पडद्यामागील कलाकार) याच निधन झाल. आजच्या दिवशी आनंदची खूप आठवण येते…
याच अपघातात आपल्या सगळ्यांचा लाडका प्रवीण डाळिंबकर गंभीर जखमी झाला होता. आम्ही सगळे त्याला भेटायला दवाखान्यात पोचलो तेव्हा प्रवीण उजवा हात वर करून, “घाबरू नका अजून ही मी जिरेटोपाच माप घेऊ शकतो.” अस म्हणाला होता. मोठा हिमतीचा कलाकार आहे हा. आजही पूर्वीच्याच ताकतीने रंगभूमीवर काम करतोय…आपल्या लाडक्या प्रवीण ची भूमिका असलेला नागराज मंजुळे दिग्दर्शित झुंड हा सिनेमा सगळीकडे जोरात चालू आहे. त्याच्या गावातील (भीमनगर, भावसिंगपुरा) मित्रांनी प्रवीणचा जाहीर सत्कार आणि महिलांसाठी एक विशेष शो आयोजीत केला आहे. हा दिवस आमच्या रंगमळा साठी खूप आनंदाचा आहे.. खूप खूप शुभेच्छा मित्रा…”, अशी पोस्ट संभाजी तंगाडे यांनी केली आहे.
संबंधित बातम्या