मुंबई : शीख समुदायाविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) विरोधात मुंबईतील खार पोलीस स्टेशनमध्ये कलम 295A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी कंगना बुधवारी तिचा जवाब नोंदवण्यासाठी येणार होती. मात्र, ती मुंबई पोलिसांसमोर जवाब नोंदवण्यासाठी आली नाही आणि पोलिसांनी सूट देण्याची मागणी करत नवीन तारीख मागितली होती. पण, पोलिसांतर्फे तिला काहीही उत्तर देण्यात आले नाही, त्यानंतर आज ती आज आपले म्हणणे नोंदवण्यासाठी खार पोलीस स्टेशन पोहोचली आहे.
विशेष म्हणजे, कृषी कायदा मागे घेण्याच्या मुद्द्यावरून, कंगनाने सोशल मीडियावर शीख समुदायाविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी लिहिल्याबद्दल देशभरात तीव्र निषेध व्यक्त केला गेला होता आणि या प्रकरणी मुंबईतील खार पोलीस ठाण्यात तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सरकारने कृषी कायदा मागे घेतल्यानंतर संतप्त कंगनाने सोशल मीडियावर शीख समुदायाविरोधात टीका केली होती. या पोस्टमध्ये तिने अनेक वादग्रस्त गोष्टी लिहिल्या होत्या. यानंतर ती ट्रोलही झाली होती. यापूर्वी तिने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला खलिस्तानी चळवळ असेही संबोधले होते. तसेच, अनेक अपशब्द वापरले होते.
कंगनाच्या पोस्टनंतर दिल्लीच्या शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीने एफआयआर दाखल केला होता. समितीने आपल्या निवेदनात म्हटले होते की, त्यांनी कंगनाच्या विरोधात मंदिर मार्ग पोलिस ठाण्याच्या सायबर सेलमध्ये ही तक्रार दाखल केली आहे. एवढेच नाही तर, शीख समाजाच्या भावना दुखावण्यासाठी त्यांनी ती पोस्ट जाणूनबुजून तयार केली होती. कंगनाच्या विरोधात तक्रार नोंदवल्यानंतर तिच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची विनंती करण्यात आली होती.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, कंगना रनौतकडे सध्या चित्रपटांची रांग आहे. तिचा ‘तेजस’ हा चित्रपट दसऱ्याच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. याशिवाय ती ‘धडक’, ‘इमर्जन्सी’सह अनेक चित्रपटांमध्ये दिसणार आहे. अभिनयासोबतच कंगना चित्रपटांची निर्मितीही करत आहे. अभिनेत्री अवनीत कौर तिच्या चित्रपटातून पदार्पण करणार आहे.
काही काळापूर्वी कंगनाचा ‘थलायवी’ हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट कंगनाच्या करिअरमधील सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून ओळखला जात आहे. ‘थलायवी’ हा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचा बायोपिक आहे. अभिनय ते राजकारण असा त्यांचा कारकिर्दीचा प्रवास यात दाखवण्यात आला आहे.
Ganapath | अरे देवा! टायगरच्या डोळ्याला काय झालं? ‘गणपत’च्या चित्रिकरणादरम्यान टायगर श्रॉफ जखमी!
चाहत्याच्या लग्नात चक्क सेलिब्रिटींची एण्ट्री, ‘ओम आणि स्वीटू’ जोडीने विवाह सोहळ्याचा आनंद दुणावला!