‘इतकं सगळं असूनही ती…’ प्राजक्ता माळी अभिनेत्री आलिया भट्टबद्दल स्पष्टच बोलली

| Updated on: Feb 24, 2025 | 1:59 PM

प्राजक्ता माळीने अभिनेत्री आलिया भट्ट बाबत बोललेलं एक वक्तव्य व्हायरल होतं आहे. तिने आलियाच्या वैवाहिक आयुष्यावरून आणि तिच्या करिअरवरून मत मांडलं आहे. यावेळी प्राजक्ता आलियाबद्दल जे काही बोलली तिचे ते वक्तव्य सध्या चर्चेत आहे.

इतकं सगळं असूनही ती... प्राजक्ता माळी अभिनेत्री आलिया भट्टबद्दल स्पष्टच बोलली
Follow us on

मराठमोळी अभिनेत्री आलिया भट्ट ही नेहमी तिच्या स्पष्ट वक्तेपणाबद्दल चर्चेत असते. कोणत्याही विषयावर ती आपलं स्पष्ट मत मांडताना दिसते. प्राजक्ताने नुकत्याच एका मुलाखतीत महिलांसाठी संसार, घर, मुलं या सर्वांवरून एक खास सल्ला दिला. तिचं हे वक्तव्य प्रचंड व्हायरल झालं आहे. त्यानंतर आता तिने अभिनेत्री आलिया भट्टबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आहे.

आलिया भट्टबद्दल प्राजक्ताचं वक्तव्य 

आलिया भट्ट ही सध्या टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने साकारलेल्या अनेक भूमिकांमुळे ती आज यशस्वी आहे. आलिया तिच्या प्रत्येक भूमिकेसाठी तेवढीच मेहनत घेताना दिसते. आलियाने अनेक चित्रपटातून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. प्राजक्ताने आलियाच्या करिअरबद्दल आणि तिच्या वैवाहिक आयुष्याला धरून एक कमेंट केली आहे.

“त्या मुलीचं कौतुक वाटतं”

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने नुकत्याच एका दिलेल्या मुलाखतीत तिला तिच्या आवडत्या अभिनेत्रीबद्दल विचारण्यात आलं. यावर उत्तर देताना प्राजक्ताने आलिया भट्टचं नाव घेतलं. प्राजक्ताला आलिया फक्त दिसण्यासाठी आवडत नाही तर, तिच्या करिअर आणि वैवाहिक जिवनातील समतोलमुळे ती आवडते. प्राजक्ताने म्हटलं की, “आलिया वेगवेगळे जे काही ट्राय करत असते, ते मला आवडतं. तिने कशालाच हद्दपार केलेलं नाही. ती सगळ्याच गोष्टी करत असते. मला त्या मुलीचं कौतुक वाटतं. मुलगी, नवरा, संसार इतकं सगळं असून ती करिअरमध्ये यशाच्या शिखरावर आहे. हे छान आहे, हे जमलं पाहिजे”, असं म्हणत तिने आलिया भट्टचं कौतुक केलं आहे.

पन्नाशीत गेल्यानंतरही तुम्ही नवीन काहीतरी सुरू करू शकता

दरम्यान प्राजक्ताने याच मुलाखतीत यावरूनच महिलांनाही खास सल्ला दिला आहे. तिने महिलांना तिचं घर, संसार, मूलं सांभाळणं ठिक आहे. पण ते सर्व करण्यामध्ये तुम्ही स्वत:ला विसरू नका असा सल्ला दिला आहे.

ती म्हणाली की, “संसार, वय, पोरं सगळं बाजूला ठेऊनसुद्धा तुम्ही तुमची स्वप्नं साकार करू शकता आणि वय तर विषयच बाजूला ठेवा. वय वैगेरे असं काही नसतं. मात्र, प्रकृतीची काळजी घेतली पाहिजे. आरोग्य महत्त्वाचं आहे. ते जर तुम्ही व्यवस्थित ठेवलं तर पन्नाशीत गेल्यानंतरही तुम्ही नवीन काहीतरी सुरू करू शकता आणि करायलाच पाहिजे. तुम्हाला आतून ऊर्मी येतेय, तर तुम्ही ते केलंच पाहिजे.” असं म्हणत तिने महिलांनी लग्न झाल्यानंतरही आपल्या आवडीच्या गोष्टींना विसरून जाऊ नये असा सल्ला दिला आहे.

प्राजक्ताचा फुलवंतीनंतर आता प्रसाद खांडेकर दिग्दर्शित ‘चिकी चिकी बुबूम बुम’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात प्राजक्तासह अभिनेता स्वप्नील जोशी, वनिता खरात, रोहित माने, प्रथमेश शिवलकर, प्रार्थना बेहेरे हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.