मुंबई : बॉलीवूडचे सेलिब्रेटी नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतात. तसंच त्यांच्या बाबत जाणून घेण्यासाठी चाहते देखील उत्सुक असतात. तर सध्या अनेक बॉलीवूड सेलिब्रेटींचे लहानपणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. त्यामुळे ते लहानपणीचे फोटो पाहून नेटकऱ्यांमध्येही उत्सुकता निर्माण होते की नक्की ही सेलिब्रेटी कोण असेल. बहुतेक नेटकरी त्या फोटोंवरून सेलिब्रेटींना ओळखतातही पण काहींना समजत नाही की नक्की कोण आहे ती सेलिब्रेटी. तर आताही एका बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीचा लहानपणीचा फोटो व्हायरल होत आहे. तर ही अभिनेत्री नक्की कोण आहे याबाबत आपण जाणून घेणार आहोत
या फोटो दिसणारी क्युट मुलगी आज बॉलीवूडची सुपरस्टार आहे. तुम्हाला तिच्याबद्दल सांगायचं झालं तर या अभिनेत्रीने फक्त बॉलीवूडच नाही तर हॉलीवुडमध्ये देखील तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. या अभिनेत्रीला देसी गर्ल म्हणून देखील ओळखले जाते. ती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते आणि तिची चाहतेही लाखोंच्या संख्येत आहे. तर ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून सुपरस्टार प्रियांका चोप्रा आहे.
प्रियांका चोप्राची आई मधु चोप्रा यांच्या इन्स्टाग्राम फॅन पेजवरून प्रियांकाचे काही लहानपणीचे अनसीन फोटो शेअर करण्यात आले आहेत. या फोटोत प्रियांका चोप्रा खूपच क्युट दिसत आहे. सध्या प्रियांकाचे हे लहानपणीचे गोड फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
प्रियंका चोप्राची पर्सनल लाईफ नेहमीच चर्चेत राहिली आहे. एकेकाळी प्रियांका चोप्राचं बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारसोबत अफेअर असल्याच्या बातम्या सगळीकडे रंगल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, प्रियांका चोप्राला अक्षय कुमारच्या लग्नाबाबत माहीत असताना देखील तिच्या मनात अक्षय कुमारबाबत फिलिंग्स होत्या.
प्रियांका आणि अक्षय कुमारने त्यांच्या अफेरबाबत कधीच भाष्य केलेलं नाहीये. तसंच प्रियांका चोप्रा आणि अक्षय कुमारने ऐतराज, मुझसे शादी करोगी, वक्त, अंदाज अशा अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केल आहे. सध्या हे दोघंही बॉलीवूडचे मोठे स्टार्स मानले जाता