राजामौलींचा सिनेमा कमाईच्या बाबतीत नवनवे रेकॉर्ड करताना पाहायला मिळतोच मिळतो! बाहुबलीनंतर आता आरआरआर (RRR) च्या बाबतीतही तेच होताना पाहायला मिळतंय. आता एस एस राजामौलींचा RRR हा सिनेमा हा कमाईच्या बाबतील 200 कोटींच्या जवळ जाऊन पोहोचला आहे. लवकरच या सिनेमाची इन्ट्री धूमधडाक्यात 200 कोटींच्या क्लबमध्ये होईल, अशी शक्यताही जाणकारांनी वर्तवली आहे. आरआरआरनं वर्ल्डवाईड बिझनेस कलेक्शनमध्ये (Box Office Collection 2022) तर बाहुबलीचाही रेकॉर्ड तोडलाय. अशातच नुकताच आलेला जॉन अब्राहिमचा (John Abraham) अटॅक सिनेमा तितकीशी छाप बॉक्स ऑफिसवर पाडू शकलेला नाही. मात्र आरआरआरच्या कमाईचे आकडे पाहून अनेकांना ‘आरारारा खतरनाक’ अशीच प्रतिक्रिया द्यावी लागते आहे.
आरआरआरनं कमाईच्या बाबतीत मैलाचा दगड गाठलाय. प्रदर्शित झाल्यानंतर दहा दिवसांतच आरआरआनं 800 कोटी रुपयांपेक्षा जास्तीचा बिझनेस जगभरात केलाय. दिवसागणिक या सिनेमाची कमाई रोज नवनवे उच्चांक गाठते आहे.
ट्रेड एनलिस्ट तरण आदर्श यांनी आरआरआर सिनेमाल लवकरच दोनशे कोटींचा टप्पा ओलांडेल, अशी शक्यता वर्तवली आहे. प्रदर्शनापासूनच्या बाराव्या दिवशी दोनशे कोटी कमाई होण्याची शक्यता तरण आदर्श यांनी वर्तवली आहे. आतापर्यंत या सिनेमानं 184.59 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.
दुसरीकडे जॉनचा अटॅक सिनेमा आपली बॉक्सऑफिसवर फारशी छाप पाडू शकलेला नाही. दुसऱ्या दिवशीही सिनेमाची कमाई उल्लेखनीय नव्हती. आरआरआरच्या लाटेचा फटका जॉनच्या अटॅकला बसला असल्याचंही जाणकारांचं म्हणणंय. 65 कोटी बजेटमध्ये तयार झालेल्या अटॅक सिनेमानं आतापर्यंत 12 कोटी रुपयांची कमाई केली आहे. अर्थात येणाऱ्या काळात आरआरआर सिनेमा कमाईच्या बाबतीनं आणखी किती दमदार कामगिरी करुन दाखवतो, याकडे अनेकांची नजर लागलेली आहे.
#RRR is SUPER-SOLID… Will cross ₹ 200 cr on Tue [Day 12]… #TKF and #RRR, two ₹ 200 cr films in #March, incredible indeed… Also, #JrNTR and #RamCharan‘s first ₹ 200 cr earner [#Hindi]… [Week 2] Fri 13.50 cr, Sat 18 cr, Sun 20.50 cr. Total: ₹ 184.59 cr. #India biz. pic.twitter.com/xIUpn8dtND
— taran adarsh (@taran_adarsh) April 4, 2022
अटॅक सिनेमाच्या रिलीजचा आरआरआरवर कोणतीही परिणाम जाणवलेला नाही. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी अटॅक सिनेमानं 3.75 तर 4.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे. पहिल्या दिवशीही 3.51 कोटी रुपयांच्या कमाईसह आतापर्यंत 11.51 कोटी रुपयांचा बिझनेस अटॅक सिनेमानं केलाय.
#Attack is below the mark… No major growth / jump on Day 2 and 3 is disappointing… The #RRR wave has also impacted its prospects in mass sectors… Fri 3.51 cr, Sat 3.75 cr, Sun 4.25 cr. Total: ₹ 11.51 cr. #India biz. pic.twitter.com/2J4mI48Ogx
— taran adarsh (@taran_adarsh) April 4, 2022
Video : “मराठीत सांगितलेलं कळत नाही इंग्लिशमध्ये सांगू…”, Jacqueline Fernandez झाली ‘सैराट’
Ram Charan: मोठ्या मनाचा माणूस; RRR सिनेमाच्या स्टाफला रामचरणने दिली सोन्याची नाणी
Kaun Hai Pravin Tambe VIDEO: बायोपिक पाहून टेनिस क्रिकेटचा बाहशाह प्रवीण तांबेंच्या डोळ्यात आलं पाणी