मुंबई : बॉलिवूड विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. स्टार अभिनेता साजिद खान यांनी वयाच्या वयाच्या 71 वर्षी शेवटचा श्वास घेतला आहे. (Sajid Khan Passed Away) ‘मदर इंडिया’ मधील सुनील दत्त यांच्या बिरजूच्या लहानपणातील भूमिका साकारली होती. बिरजू पात्राची साजिद खान यांनी छाप पाडली होती. कर्करोगाने साजिद खान यांचं निधन झाल्याची माहिती समजत आहे. याबाबत साजिद यांचा मुलगा समीर खाने याने माहिती दिली.
गेल्या काही वर्षांपासून साजिद खान कॅन्सर आजाराने ग्रस्त होते. शुक्रवारी म्हणजेच 22 डिसेंबरला त्यांचं निधन झाल्याची माहिती समीर खान याने दिली. साजिद खान यांनी दुसरं लग्न केलं होतं त्यानंतर ते केरळमध्ये स्थायिक झाले होते. चित्रपट सृष्टीपासून ते दूर गेले होते आणि समाजहिताच्या कामात गुंतल्याचं समीर खान याने सांगितलं.
साजिद खान यांनी कमी काळ काम केलं होतं पण त्यांच्या अभिनयाची कौतुक झालं होतं. साजिद खान यांनी आपल्या पहिल्या चित्रपटाने सर्वांना वेड लावलं होतं. साजिद खान यांनी मदर इंडिया या चित्रपटामध्ये सुनील दत्त यांच्या बिरजूची भूमिका साकारली होती. साजिद यांचं वय त्यावेळी अवघ 6 वर्षे होतं. साजिद खान यांनी कमी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
दरम्यान, साजिद यांना सन ऑफ इंडिया या चित्रपटाने त्यांना देशातच नाहीतर जगात ओळख मिळाली होती. या चित्रपटातील त्यांनी केलेल्या कामाचंही चांगलं कौतुक झालं होतं. जिंदगी और तुफान, दहंस आणि हार्ट अँड डस्ट या चित्रपटांमध्येही साजिद यांनी काम केलं होतं.