सलमान खान आणि संगिता बिजलानी याचं लग्न ठरलं होतं, कार्डही छापली होती, पण…

| Updated on: Dec 29, 2024 | 9:38 PM

बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान हा ५९ वर्षांचा झाला तरी त्याचे लग्न काही झालेले नाही. यापुढेही सलमान खान लग्न करेल की नाही कोणालाच माहिती नाही. त्याची एक पूर्वाश्रमीची मैत्रिण अभिनेत्री संगिता बिजलानी हिच्या सोबत त्याच्या लग्नाच्या पत्रिकाही देखील छापल्या गेल्या होत्या अशी कबूली खुद्द संगिता बिजलानी हीनेच एका कार्यक्रमात दिली आहे.

सलमान खान आणि संगिता बिजलानी याचं लग्न ठरलं होतं, कार्डही छापली होती, पण...
Salman khan and sangeeta bijani
Follow us on

बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान याचा अलिकडे ५९ वा जन्मदिन साजरा झाला. जगभरातील चाहत्यांनी अभिनेत्याला शुभेच्छा दिल्या आहेत. सलमानचे चित्रपट इतके तुफान चालत असतानाही सलमानने लग्न मात्र काही केले नाही. या संदर्भात सलमानला नेहमी विचारले जाते. परंतू सलमान हसण्यावारी हा प्रश्न उडवून लावत असतो. आता सलमान लग्न करणार कधी हे साक्षात देवालाही माहिती नाही असे एकदा त्याचे वडील सलीम खान एका मुलाखतीत म्हणाले होते. मात्र, सलमानचे लग्न त्याची गर्लफ्रेंड संगिता बिजलानी हिच्याशी होणार होते. लग्न पत्रिका देखील छापल्या होत्या. मात्र माशी कुठे शिंकली माहिती नाही, पण हे लग्न मोडलं…संगिता बिजलानी हिला हा प्रश्न विचारण्यात आला…

इंडियन आयडल १५ च्या एका कंटेस्टन्टने अभिनेत्री संगिता बिजलानी हीला सलमान खान आणि त्यांच्या लग्नाच्या बाबत प्रश्न विचारला होता. तुमच्या लग्नाची पत्रिका देखील छापण्यात आली होती हे खरे आहे का ? असे विचारता सन्नाटा पसरला. त्यानंतर संगिता या प्रश्नाला काय उत्तर देणार याची उत्सुकता लागली होती. त्यानंतर संगिता बिजलानी हीने कबूली दिली की ही गोष्ट खोटी तर नाही..आता बस ना..आता माझ्यावर प्रश्नांची वीज कोसळवू नको, माझं नाव बिजलानी आहे. कन्फेशन झाले. परंतू ही कहाणी नंतर कधी तरी…असे सांगून संगिता बिजलानी हीने उत्तर अर्धवट दिले आहे.

हे सुद्धा वाचा

येथे पोस्ट पाहा –


सलमान खान ५९ वर्षांचा झाला असला तरी त्याने लग्न काही केलेले नाही. परंतू तो बॉलीवूडमधील अनेक जणींच्या रिलेशन्सशिप्स मध्ये होता. ऐश्वर्या राय पासून तर सोमी अलीपर्यंत त्याच्या मैत्रीणीच्या यादीत आहेत. परंतू कोणासोबत त्याचे नातं टिकलं नाही.सध्या सलमान याचे फोटो युलिया वंतूर हीच्या सोबत व्हायरल होत आहेत. दोघांचे फॅमिलीवाले एकमेकांच्या परिचयाचे झाले आहेत. चाहत्यांना तर ही जोडी पसंत पडली आहे. या दोघांनी आपले नाते लग्नापर्यंत नेले पाहीजे अशी त्याच्या चाहत्याची इच्छा आहे.