Leauge : बॉलिवूड स्टार शाहरूख, अक्षय कुमारनंतर संजय दत्त यानेही विकत घेतला क्रिकेटमधील ‘हा’ संघ

| Updated on: Jun 22, 2023 | 11:12 PM

इंडस्ट्री गाजवणाऱ्या या खलनायकाने एक टिम विकत घेत क्रिकेटमध्ये झकास एन्ट्री मारली आहे. आता संजय दत्तही क्रिकेट टीम विकत घेत या फिल्मस्टार, उद्योजकांच्या यादीत आला आहे.

Leauge : बॉलिवूड स्टार शाहरूख, अक्षय कुमारनंतर संजय दत्त यानेही विकत घेतला क्रिकेटमधील हा संघ
Follow us on

मुंबई :  बॉलिवूडचा स्टार अभिनेता संजय दत्त कायम चर्चेत असलेला पाहायला मिळतो. अनेक फिल्मस्टार, उद्योजपती वेगवेगळ्या खेळांमधील संघ विकत घेतात. आता संजय दत्तही क्रिकेट टीम विकत घेत या फिल्मस्टार, उद्योजकांच्या यादीत  आला आहे. इंडस्ट्री गाजवणाऱ्या या खलनायकाने एक टिम विकत घेत क्रिकेटमध्ये झकास एन्ट्री मारली आहे.

झिम्बाब्वे क्रिकेट बोर्ड ‘ जिम एफ्रो टी 10’ टूर्नामेंटचे आयोजन करणार आहे. या टूर्नामेंटची सुरुवात 20 जूलै पासून करण्याचे नियोजन असताना, आता यात संजय दत्तने एंट्री करत “हरारे हरिकेन्स” ही टीम विकत घेतली आहे. संजय दत्तने एरीज ग्रुप ऑफ कंपनीजचे सर सोहन रॉय यांच्या सोबत ही टीम विकत घेतली आहे.

संजय दत्तने क्रिकेटच्या मैदानात जोरदार एंट्री केलीय. झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डने या स्पर्धेचे आयोजन केले असून यात 5 संघ खेळणार आहे. ज्यात डरबन कलंदर्स, जोबर्ग लायन्स, केपटाऊन सैम्प, बुलावायो ब्रेव्स आणि हरारे हरिकेन्स हे संघ आहेत. या स्पर्धेत डरबन कलंदर्स हा संघ पाकिस्तान सुपर लीगच्या फ्रेंचाइजी लाहौर कलंदर्सच्या मालकीची आहे.

जिम एफ्रो टी 10 झिम्बाब्वेची पहिली फ्रेंचाइजी क्रिकेट स्पर्धा आहे. ही स्पर्धा हरारे येथे आयोजित करण्यात येणार आहे. खेळाडूंना या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 2 जूलै पासून नाव नोंदवता येणार आहे. संजय दत्तने टीम विकत घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना आनंद झाल्याचं म्हटलं आहे. हरारे हरिकेन्स स्पर्धेत चांगली कामगिरी करुन प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करेल, असं संजय दत्तने सांगितलं.

भारतात क्रिकेट खेळ हा धर्मासारखा आहे. यामुळे आमचे कर्तव्य आहे कि आम्ही खेळाला जगात सर्व ठिकाणी घेवून जाऊ, असंही संजय दत्त म्हणाला.

दरम्यान, क्रिकेट खेळात झिम्बाब्वेचा इतिहास चांगला आहे. म्हणूनच त्यांच्याशी जोडलं जान माझ्यासाठी आंनदाची गोष्ट आहे. हरारे हरिकेंसने ‘जिम एफ्रो टी 10’ मध्ये चांगली कामगिरी करावी, अशी इच्छाही संजय दत्तने यावेळी व्यक्त केली आहे.